• Home
  • ताज्या बातम्या
  • वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.
Image

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

 प्रतिनिधी.
वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील वडगाव निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसन्न व उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल साबळे पोलीस उपनिरीक्षक वडगाव निंबाळकर यांनी केले. यावेळी विविध दैनिक, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस-पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, समाजापर्यंत अचूक व सकारात्मक माहिती पोहोचावी, यासाठी पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार श्री गणेश आळंदीकर प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित प्रत्येक पत्रकारास पुस्तक भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे पोलीस व पत्रकार यांच्यातील नाते अधिक बळकट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Releated Posts

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ,…

ByBymnewsmarathi May 29, 2026

श्री क्षेत्र वीर येथे अभाविप बारामती आयोजित “सह्यादी स्पर्श” समर कॅम्प उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी

प्रतिनिधी – बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक २५ मे रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती तालुक्यात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; रक्तमिश्रित साहित्य जप्त

प्रतिनिधी. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या…

ByBymnewsmarathi May 20, 2026