• Home
  • माझा जिल्हा
  • माहितीचा अधिकार कायद्याच्या परिणामकारक वापरामुळे, पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातील विकसित आणि भ्रष्टाचारमुक्त भारत उभारण्यास सहाय्य होईल
Image

माहितीचा अधिकार कायद्याच्या परिणामकारक वापरामुळे, पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातील विकसित आणि भ्रष्टाचारमुक्त भारत उभारण्यास सहाय्य होईल

माहितीचा अधिकार कायद्याच्या परिणामकारक वापरामुळे, पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातील विकसित आणि भ्रष्टाचारमुक्त भारत उभारण्यास सहाय्य होईल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मतपारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग ही पंतप्रधान मोदी यांच्या शासनाच्या मॉडेलची ओळख आहे-केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंहमाहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिककेंद्री शासन यावर केंद्रीय माहिती आयोगाच्या 15 व्या परिषदेला डॉ. जितेंद्र सिंह यांनी संबोधित केले2020-21मध्ये असलेल्या 38116 प्रकरणांची संख्या 2021-22 मध्ये 23405 वर आणण्यात केंद्रीय माहिती आयोगाला यशः डॉ. जितेंद्र सिंहलोकशाहीचा महत्वाचा स्तंभ म्हणजे सक्षम नागरिक असून माहितीच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम करण्यात केंद्रीय माहिती आयोग काम करत राहीलः

डॉ. जितेंद्र सिंहमाहिती अधिकार कायद्याच्या परिणामकारक उपयोगामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातील विकसित आणि भ्रष्टाचारमुक्त भारत उभारण्यास सहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज केले. विज्ञान भवन येथे आज झालेल्या केंद्रीय माहिती आयोगाच्या 15 व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेची कल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिककेंद्री पशासन ही होती. माहिती अधिकाराचा मुख्य उद्देश हा नागरिकांना सक्षम करणे, पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचारी व्यवस्थेवर मात करणे आणि लोकशाही देशातील लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने नेणे हा आहे.डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पारदर्शकता आणि नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणे ही मोदी सरकारच्या सुशासनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

सक्षम नागरिक हेच लोकशाहीचे प्रमुख स्तंभ आहेत आणि केंद्रीय माहिती आयोग नागरिकांना माहिती अधिकाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम सुरूच ठेवेल असेही त्यांनी नमूद केले. डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले की, मोदी सरकारच्या काळातच माहिती अधिकारासाठीच्या अर्जांचे ई फायलिंग करण्यासाठी चोवीस तास दिवसा आणि रात्री कधीही सुरू असलेले पोर्टल सुरू करण्यात आले. तसेच देशाच्या किंवा परदेशातील कोणत्याही भागातून अर्ज करण्याची सुविधा या पोर्टलवर आहे. केंद्रीय माहिती आयोगाने विकसित केलेल्या मोबाईल ऍपने नागरिक सहजतेने अर्ज करू शकतात तसेच तक्रारींची दृकश्राव्य प्रकारे सुनावणी करण्याची सुविधाही पुरवण्यात आली आहे. मंत्री म्हणाले की, परिणामी, केंद्रीय माहिती आयोगाला 2020-21 मध्ये असलेल्या प्रकरणांची संख्या 38116 वरून 2021-22 मध्ये 23405 इतकी कमी करण्यात यश मिळाले.डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले की, माहिती अधिकाराशी संबंधित प्रलंबित प्रकरणे वाढत असून त्यांचा निपटारा गतिमान पद्धतीने करून त्यांची संख्या सातत्यपूर्णरित्या घटती ठेवणे आयोगाने साध्य केले आहे.

त्याबद्दल त्यांनी केंद्रीय माहिती आयोगाची प्रशंसा केली.मुख्य माहिती आयुक्त वाय के सिन्हा आपल्या भाषणात म्हणाले की, माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून सरकारमधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा स्तर वाढला आहे.राज्यांचे तसेच केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयोगातील इतर अधिकारी या परिषदेला उपस्थित होते.

Releated Posts

एसआयआर मोहिमेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार यादीला स्थगिती; ७५४ ग्रामपंचायतींसाठी नवी मतदार यादी वापरण्याची शक्यता

प्रतिनिधी राज्यात सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अर्थात मतदार यादीच्या सखोल पुनरिक्षण मोहिमेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेत…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026