• Home
  • ताज्या बातम्या
  • निंबुत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून मदनराव काकडे मैदानात उतरण्याची शक्यता.
Image

निंबुत पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून मदनराव काकडे मैदानात उतरण्याची शक्यता.

प्रतिनिधी.

नींबूत (ता. बारामती) येथील पंचायत समिती गणातून आगामी
निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मदनराव काकडे हे उमेदवारीच्या शर्यतीत उतरण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले मदनराव काकडे यांनी सामाजिक, सहकार आणि विकासात्मक कामांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
नींबूत पंचायत समिती गण हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, या गणातून राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम उमेदवार देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर मदनराव काकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा पक्षांतर्गत पातळीवर सुरू आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका, विविध सामाजिक उपक्रमांतील सहभाग आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांना कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः नींबूत परिसरातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य विषयक प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार कोण असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मदनराव काकडे यांच्या नावावर पक्षश्रेष्ठी अंतिम शिक्कामोर्तब करतात का, याबाबत उत्सुकता आहे.
जर त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली, तर नींबूत पंचायत समिती गणात निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Releated Posts

मदने कुटुंबीयांकडून वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जित न करता झाडांना विसर्जित.

प्रतिनिधी – आपल्या पूर्वजांनी काही रूढी आणि परंपरा सुरू केल्या त्या आपण पाळत आलो मात्र काळानुरूप त्यामध्ये काही…

ByBymnewsmarathi Feb 4, 2026

संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती निंबुत मध्ये उत्साहात साजरी 

  प्रतिनिधी. संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 649 वी जयंती नींबूत येथे साजरी करण्यात आली. भारतीय संत…

ByBymnewsmarathi Feb 1, 2026

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान व मतमोजणी तारखेमध्ये बदल. निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय.

प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा…

ByBymnewsmarathi Jan 29, 2026

करंजे वि.का.सोसायटी करंजे चेअरमनपदी महेश हनुमंतराव शेंडकर यांची बिनविरोध निवङ

प्रतिनिधी. करंजे सोसायटी विध्यमान चेअरमन साहेबराव दगङू गायकवाड यांनी आपल्या ठरलेल्या मुदतीमध्ये चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामूळे रिक्त…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026