मुख्य मजकुरावर जा
Monday, 21 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 01 November 2022 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माळेगाव येथे ताडी प्राशन केल्यामुळे मयत झालेल्या युवकांच्या कुटुंबाला रविराज तावरे यांच्याकडून आर्थिक मदत.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 1, 2022 1 मिनिट वाचन 8,527 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

माळेगाव बुद्रुक येथील चंदननगर परिसरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या राजू लक्ष्मण गायकवाड (वय 35) हनुमंता मारुती गायकवाड (वय 40) भटक्या समाजातील या दोन तरुणांचा रविवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी विषारी ताडी पिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.

या पार्श्वभूमीवर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रविराज तावरे यांनी चंदननगर येथे जाऊन सदरच्या दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच सर्व समाज बांधवांशी यावेळी चर्चा केली.यावेळी या समाज बांधवांनी गावातील बेकायदेशीर दारू विक्री पूर्णता बंद झाली पाहिजे आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कर्तेपुरुष गेल्यामुळे हि कुटुंबे पूर्णपणे निराधार झालेली असल्याने सदर दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत व आर्थिक मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.यावेळी माळेगाव पंचक्रोशीतील सर्व अवैद्य धंदे पूर्णपणे बंद होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे व दोन्ही पीडित कुटुंबीयांना शासकीय मदत तसेच आर्थिक मदत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते रविराज तावरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांच्या स्वतःच्या वतीने दोन्ही कुटुंबीयांना अकरा हजार रुपये प्रत्येकी अशी रोख स्वरूपाची मदत केली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख