• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्याचा निर्णय प्रादेशिक सह संचालकांनी फेटाळला… श्री सतिश काकडे …
Image

सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्याचा निर्णय प्रादेशिक सह संचालकांनी फेटाळला… श्री सतिश काकडे …

प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता. बारामती या कारखान्याच्या दि. २९/९/२०२२ रोजी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यातील अजेठा (पुरवणी) वरील विषय क. १ नुसार पोटनियमातुन गावे कमी करण्याचा राजकीय हेतुने सभासदांची इच्छा नसताना बळजबरीने सभासदत्वासह माळेगाव कारखान्याला गावे जोडण्याचा प्रयत्न चेअरमन व संचालक मंडळाने केला. सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्याला जोडण्यास सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत परवानगी दिलेली नसताना खोटे प्रोसिडींग लिहून फक्त नेत्यांना खुश करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याने दि.०३/१०/२०२२ रोजी सदर १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्यात यावीत यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर शेतकरी कृती समितीने मा. साखर आयुक्त यांना सोमेश्वर कारखान्याची ही १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्यात येवु नये यासाठी त्या १० गावातील सभासदांच्या सहया घेवुन सदर अर्ज दि.१३/१०/२०२२ रोजी मा. साखर आयुक्त कार्यालयात दाखल केला.

त्यामध्ये कारखान्याचे आज विस्तारीकरण झाले असुन गाळप क्षमता वाढली आहे. सदर विस्तारवाढ करण्यासाठी वित्तीय बँकांची कोट्यावधी रूपयांची कर्जे घेतलेली आहेत. पोटनियमातील सर्व गावांच्या उसाचे गाळप गृहीत धरून कारखान्याने विस्तारवाढ केलेली आहे आणि आज ही गावे कमी केल्यानंतर कारखान्यास पुरेसा उस मिळणार नाही त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या पोटनियमातुन सदर गावे कमी करण्यात येवु नये. माळेगाव कारखान्याची स्थापना सोमेश्वर कारखान्याच्या आधी कित्येक वर्ष झालेली आहे. त्यावेळी मात्र त्या कारखान्याने ही गावे घेतली नव्हती मग ६० वर्षानंतर ही गावे घेण्याचे व देण्याचे कारण काय? जर आज हो १० गावे सोमेश्वर कारखान्याच्या पोटनियमातुन कमी करून माळेगाव कारखान्यास जोडली तर नंतर इतर गावेही आम्हाला दुसन्या कारखान्यास जोडण्यात यावे अशी मागणी करू शकतात हे मुद्दे कृती समितीने मांडले होते. त्यावर मा.प्रादेशिक सह संचालक यांनी २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी सोमेश्वर कारखान्याकडुन १० गावे माळेगाव कारखान्यास जोडणेसंदर्भात देण्यात आलेला प्रस्ताव नामंजुर केलेले आहे.

वास्तविक नेते व चेअरमन यांना माळेगाव कारखान्याची एवढीच जर काळजी होती तर त्यांना लाटे, शिरीष्णे, कुरगेवाडी, कोन्हाळे खुर्द व कोहळे ही गावे देतो असे का म्हणाले नाहीत. किंवा प कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बारामती तालुक्यामध्ये येत असलेले दोन्ही गट माळेगाव कारखान्यास जोडण्यासाठी का दिले नाहीत याचा विचार नेत्यांनी व चेअरमन यांनी का केला नाही. हे केवळ राजकारणासाठी व भविष्यात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत कधीही त्रास होवु नये म्हणुन केलेला डाव होता. परंतु त्यामुळे भविष्यात सोमेश्वर कारखाना आर्थिक अडचणीत गेला असता म्हणुन कृती समितीने हा डाव हाणून पाडला आहे.

तसेच चेअरमन यांनी नेत्यांना खुश करून पुढील काही वर्ष चेअरमन पद वाढवून मिळावे यासाठी सोमेश्वर कारखान्याची १० गावे माळेगाव कारखान्यास जोडण्यात यावी यासाठी साखर आयुक्त कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाने तात्काळ निर्णय द्यावा यासाठी त्या १० गावातील काही ठरावीक सभासदांना हाताशी धरून चेअरमन यांनी मा. हायकोर्टात जनहित याचिका सुध्दा दाखल केली होती व त्यासाठी नामांकित वकीलाची नेमणुक करून त्याची फी देखील सोमेश्वर कारखान्याने दिली असल्याची खारीशिर माहिती मिळत आहे.तरी यापुढे मेअरमन यांनी कारखान्याच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावेत येते मंडळींना खुश करण्यासाठी कारखान्याच्या विरोधी निर्णय घेवु नयेत अशी कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026