• Home
  • इतर
  • काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील ‘मनशक्ती प्रयोग केंद्रा मार्फत’ मार्गदर्शन*.
Image

काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील ‘मनशक्ती प्रयोग केंद्रा मार्फत’ मार्गदर्शन*.

प्रतिनिधी
सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी व बारावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील ‘मनशक्ती प्रयोग केंद्रामार्फत’ ‘परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी’ मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मनशक्ती प्रयोग केंद्राचे साधक मा. मनीष शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते, यावेळी संस्थेचे सचिव श्री सतीशराव लकडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप, व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ.सुजाता भोईटे, मनशक्ती केंद्राचे साधक स्वप्ना चौधरी, अनिल पिंपरकर व अन्य साधक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मा. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना विविध मानसशास्त्रीय प्रयोगाद्वारे यश संपादन करण्यासाठीच्या सात गोष्टींची माहिती दिली व या गोष्टी आत्मसात केल्यानंतर यश प्राप्तीसाठी या गोष्टी खूप अनुकूल आहेत असे विद्यार्थ्यांना विविध उदाहरणाद्वारे पटवून दिले. तसेच अभ्यासात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी बुद्धीवर्धन पद्धत, सारांश पद्धत, समजावून सांगितली. तसेच विद्यार्थ्यांना मनशांती साठी विविध प्रात्यक्षिके सादर करून घेतले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर यांनी मनशक्तीसाठी शैव व वैष्णव यांचे दाखले देऊन मन:शांती करण्याबाबत आपल्या अध्यात्मात सुद्धा सांगितलेली आहे हे विचार मांडले तसेच वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांनी इंद्रियावर ताबा मिळवल्यानंतर जीवन अधिक सुखकर होते हे सांगितले.तसेच वेगवेगळे दाखले देत मन:शांती बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व दुःखाचे मूळ कारण तॄष्णा आहे असे स्पष्ट केले. ‌‌
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.जे. एन. खोमणे यांनी केले,तर आभार प्रा.आर.ई होळकर यांनी मानले.

Releated Posts

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025

३६४ पोलिस निरीक्षकांची पदोन्नती फक्त २४ तासांत रद्द : पोलिस दलात खळबळ

प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलातील मोठ्या घडामोडीत ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांची (API) पोलिस निरीक्षक (PI) पदावर करण्यात आलेली पदोन्नती…

ByBymnewsmarathi Aug 23, 2025