मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 13 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

mnewsmarathi 28 Mar 2024 1 मिनिट वाचन 3,781 वाचन

प्रतिनिधी

छेडछाडीमुळे एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार भागात घडली. युवतीची छेड काढणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अजिंक्य आवटे (रा. भोसरी), सुजल खुणे (रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत युवतीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती महाविद्यालय, शिकवणीला जात असताना आरोपी अजिंक्य आणि सुजल यांनी तिचा पाठलाग करुन छेडछाड केली. दोघांनी तिची छायाचित्रे काढली. त्यानंतर छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. गेले दोन महिने आरोपी तिला त्रास देत होते. त्यांच्या छेडछाडीमुळे युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे तपास करत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi