मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 07 November 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

निवडणुकीच्या प्रशिक्षणाला नकार दिल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध थेट गुन्हा

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 7, 2024 1 मिनिट वाचन 8,516 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत दिलेले आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध राष्ट्रीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत घडला.

मंडळ अधिकारी लिंबराज सलगर (वय ५०, रा. मांजरी बुद्रुक) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मावळ विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्रशिक्षणाबाबत आदेश दिले होते. त्यांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार मुल्ला तपास करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख