२४ तासांत प्रेमभंगातून प्रेयसीवर गोळीबार करणारा आरोपी जेरबंद

प्रतिनिधी बाणेर येथे प्रेयसीवर गोळीबार करून पसार झालेला आरोपी गौरव नायडू (२५, रा. पुनावळे) याला गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने केवळ २४ तासांत अटक केली. दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विरभद्रनगर, बाणेर येथील अश्वमितः हाऊसजवळ फिर्यादी महिलेजवळ अज्ञात इसमाने येऊन गोळीबार केला. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. […]

Continue Reading

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मु. सा. काकडे महाविद्यालयात विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन 

प्रतिनिधी सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन २८ व २९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते. क्रीडास्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व मेजर ध्यानचंद ट्रॉफीचे अनावरण करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या […]

Continue Reading

राष्ट्रीय लोकअदालतीचे १३ सप्टेंबर रोजी आयोजन.

प्रतिनिधी – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपआपसातील वाद समझोत्याने मिळविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवार १३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन […]

Continue Reading

पगाराच्या वादातून हॉटेल मालकाचा खून

प्रतिनिधी पुणे शहरात पगाराच्या वादातून झालेल्या भांडणाने थरारक वळण घेतले आहे. कोण्धवे धवडे परिसरातील पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट मध्ये मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत हॉटेल मालक संतोष सुंदर शेट्टी (वय 45) यांचा त्यांच्या हॉटेलमधील वेटर उमेश दिलीप गिरी (वय 38) याच्यासोबत पगारावरून वाद झाला. मालक वारंवार काम व्यवस्थित करण्यास सांगत असल्याने […]

Continue Reading

सहकारनगरात खोटे पोलीस बनून लॉज कर्मचाऱ्याची फसवणूक

प्रतिनिधी सहकारनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून एका लॉजमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाची फसवणूक केली. घटनेत आरोपींनी साध्या कपड्यांत येऊन पीडित तरुणाला थांबवलं. त्यानंतर कारमध्ये बसवून खोटा अटकप्रसंग रचला. आरोपींनी तरुणावर दबाव टाकून त्याच्याकडून मोबाईलद्वारे युपीआय (UPI) व्यवहारातून तब्बल सहा हजार रुपये उकळले. या घटनेनंतर तरुणाने धीर गोळा […]

Continue Reading

कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

बारामती, दि. २७: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तथापि, या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी […]

Continue Reading

मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘विभाजन विभिषिका स्मरण दिन’ साजरा

प्रतिनिधी. सोमेश्वर नगर : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमेश्वर नगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (यु.आय.डी. – बी०२१) विभागाच्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी ‘विभाजन विभिषिका स्मरण दिन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पोपट शिंदे यांचे ‘विभाजन […]

Continue Reading

३६४ पोलिस निरीक्षकांची पदोन्नती फक्त २४ तासांत रद्द : पोलिस दलात खळबळ

प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलातील मोठ्या घडामोडीत ३६४ सहायक पोलिस निरीक्षकांची (API) पोलिस निरीक्षक (PI) पदावर करण्यात आलेली पदोन्नती फक्त २४ तासांत रद्द करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक (DGP) कार्यालयाने २१ ऑगस्ट रोजी हा आदेश जारी केला होता; मात्र बॉम्बे हायकोर्ट आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (MAT) निर्देशांच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी तो मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे […]

Continue Reading

गांजा विक्री प्रकरणात उत्तर प्रदेशातील तरुण गजाआड

प्रतिनिधी गांजा विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना बाणेर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन किलाे गांजा जप्त करण्यात आला. रवी विजय वर्मा (वय १९), कौशलेंद्र नथूराम वर्मा (वय २३, दोघे सध्या रा. शिव काॅलनी, पिंपळे सौदागर, मूळ रा. भरतकुंभ, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वर्मा बाणेर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार […]

Continue Reading

पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पांडुरंग भुजबळ

वाल्हे प्रतिनिधी – सिकंदर नदाफ पोलीस मित्र सेवाभावी फाउंडेशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रावसाहेब भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. पांडुरंग भुजबळ यांनी अनेक वर्षांपासून अपघात ग्रस्तांना मदत केली असून ग्राम सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला देखील मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच […]

Continue Reading