Home
बारामती शहर पोलिसांचे अवैद्य दारू गुत्तेदारांवर छापे.
प्रतिनिधी. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अंकित गोयल यांनी सर्व छोटे मोठे अवैध धंदे वर कारवाई करून ते बंद करावे याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे त्यांच्या आदेशाची तंतोतंत पालन होईल याबाबत पाठपुरावा करत आहेत बारामती शहर पोलिसांनी काल अवैध दारू व जुगार ठिकाणावर छापे […]
मुंढवा पोलीस ठाणेची पंधरवाडयात तिसरी मोठी कामगिरी पीएमटी बस मध्ये गर्दिचा फायदा घेवून प्रवाशांचे मोबाईल चोरणा-या चोरटयांना केले जेरबंद आरोपकडुन तब्बल २,७०,०००/- रु किमतीचा मुददेमाल केला जप्त
प्रतिनिधी. याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक २७/०४/२०२३ रोजी मा वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री लकडे सो व क्राईम पोलीस निरीक्षक श्री काकडे सो यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक संदीप जोरे व स्टाफ असे मुंढवा पोलीस दाखल मोबाईल चोरीच्या गुन्हा रजि नं १३९ / २३ भा द वी ३७९ प्रमाणे […]
बारामती शहर व परिसरात पोलिसांकडून लॉज चेकिंग
प्रतिनिधी बारामती शहर व परिसरामध्ये जोडप्यांना खोल्या काही तासासाठी भाड्याने दिल्या जातात. या कपलमध्ये बऱ्याच महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांचा सुद्धा समावेश आहे या प्रकारच्या तक्रारी माननीय अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी स्वतः व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक शहर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे तसेच बारामती […]
बारामती ! वडगाव निंबाळकरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ व २ चा शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.
वडगाव निं.प्रतिनिधी- फिरोज भालदार पंचायत समिती बारामती (शिक्षण विभाग) यांच्या सौजन्याने ” वडगाव निंबाळकरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ व २ मध्ये पहिल्याच शाळापूर्व तयारी मेळाव्यात इयत्ता पहिलीच्या ५० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला. अजून जूनमध्ये आणखी विद्यार्थी शाळेत दाखल होतील,असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. मुलांचे वजन,उंची मोजमाप केले.शारीरिक,बौद्धिक,भावनिक,सामाजिक विकासाच्या नोंदी करून विकासपत्र व शाळेतील […]
जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत गावांच्या प्राथमिक आराखड्यांना १ मेच्या ग्रामसभेत मान्यता घ्या-प्रांताधिकारी वैभव नावडकर*
प्रतिनिधी. बारामती, दि. २७ : बारामती उप विभागात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गतच्या कामांसाठी निवडण्यात आलेल्या गावातील कामांच्या प्राथमिक आराखड्यांना येत्या १ मेच्या ग्रामसभेत मान्यता घेऊन आराखडे अंतिम करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिले. बारामती उप विभागातील ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गतची आढावा बैठक प्रशासकीय भवनातील सभागृहात प्रांताधिकारी वैभव नावडकर […]
स्वाधार योजनेचे ५ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार*
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाने २४ तास काम करून १ हजार २३२ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या ५ कोटी रुपयांचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. […]
बारामती शहर पोलिसांकडून एक गावठी पिस्तल व तीन जिवंत काडतूस जप्त
प्रतिनिधी पुणे ग्रामीण हा औद्योगीकरण झालेला जिल्हा आहे या ठिकाणी या ठिकाणी वर्चस्वासाठी धमकवण्यासाठी तसेच इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट साठी अवैध अग्नीशास्त्राचा वापर होत असतो माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकारे अग्नीशास्त्रांचा कायम शोध घेण्याबाबत दर दिवशी दर आठवड्याला ते आढावा घेत असतात. […]
नीरा उजव्या कालव्याची १९ जूनपर्यंत सलग दोन आवर्तने* *पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कालवे सल्लागार समिती बैठकीत निर्णय*
प्रतिनिधी पुणे, दि. २६: नीरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार १० मार्चपासून १२ मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून दुसरे सलग आवर्तन १३ मे ते १९ जूनपर्यंत देण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समिती बैठकीत ठरले. जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका शासकीय विश्रामगृह येथे […]
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी उत्पन्नाचे दाखले जमा करण्याचे आवाहन*
प्रतिनिधी बारामती, दि. २६ : बारामती तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी ३० जून पर्यंत उत्पन्नाचे दाखले जमा करण्याचे आवाहन तहसिलदार गणेश शिंदे यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी तहसिलदार उत्पन्न दाखले काढून आपापल्या गावातील तलाठी कार्यालयात जमा करावेत. जे लाभार्थी ३० जून पूर्वी दाखले जमा करणार नाहीत त्यांना योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान […]
संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान अभियान संपन्न…
प्रतिनिधी देशभरात ५०,००० हून अधिक यूनिट रक्त संकलित, गंगाधाम पुणे येथे ११८० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान रक्तदानातून तयार होतात रक्ताची नाती – निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज गंगाधाम, पुणे २४ एप्रिल, २०२३ – ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण […]