Home

1 min read

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत*

प्रतिनिधी. पुणे दिनांक २०: रांजणगांव येथील औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केले. रांजणगांव औद्योगिक वसाहत येथील रिया हाऊस येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) व चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत […]

1 min read

प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित- मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे

प्रतिनिधी  नाममात्र १ हजार रुपये नोंदणी शुल्क आणि १ हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ राज्यात कार्यान्वित करण्यात आली असून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी केले आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा […]

1 min read

स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत राज्यात ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी

प्रतिनिधी  राज्यात मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत १ हजार २०० शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपप्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक मान्यता दिली असून त्यातील ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषि संचालक (आत्मा) तथा स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष प्रमुख दशरथ तांभाळे यांनी दिली आहे. […]

1 min read

राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण धोरण लागू

प्रतिनिधी राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  केंद्र शासनाच्या १७ मे २०२२च्या आदेशाप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट – ड ते गट – अ च्या निम्नस्तरापर्यंत पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येईल. दिव्यांग कर्मचाऱ्यांना […]

1 min read

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवर सारथीमार्फत शैक्षणिक सवलती, सुविधांसाठी सर्वंकष समान धोरण आणणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय,महाज्योतीच्या धर्तीवरच सारथीमार्फत सवलती आणि सुविधा देण्यासाठी सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह, […]

1 min read

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन*

प्रतिनिधी पुणे दि. १८ : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२३-२४ अंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली असून इच्छुकांनी ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी […]

1 min read

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन*

प्रतिनिधी पुणे दि. १८: यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, चिंतामणीनगर, थेऊर च्या सर्व सभासदांनी ना परतावा स्वरूपात स्वेच्छेने १५ मे पर्यंत निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी केले आहे. कारखान्याच्या ११ मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी ना परतावा म्हणून स्वेच्छेने वर्गणी स्वरूपात निवडणूक निधी जमा […]

1 min read

महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ*

प्रतिनिधी. पुणे, दि.१८: राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण १७ लाख १४ हजार महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे. राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. महामंडळाने १७ मार्च २०२३ […]

1 min read

विभागीय महारोजगार मेळाव्याचे २१ एप्रिल रोजी आयोजन*

प्रतिनिधी. महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विचार प्रबोधन वर्ष २०२३ च्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे महापुरुषांची संयूक्त जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन .

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथे सत्यशोधक ओबीसी महासंघ यांच्या आयोजित महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त मंगळवार दि.१८/४/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्राअंगणात व्याख्यानाचे आयोजण केले आहे .सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवा निमित्तसत्यशोधक ओबीसी महासंघ. मराठा सेवासंघ. छत्रपती क्रांती सेना. मौर्य […]