Home
सध्याच्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता गरजेची – विक्रम सेन
प्रतिनिधी – जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि त्यांच्या गरजा ओळखून पत्रकारांनी वार्तांकन केले पाहिजे कारण सध्याच्या बदलत्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता अत्यंत गरजेची असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी व्यक्त केले. बारामती येथे भारतीय पत्रकार संघाचा पदग्रहण सन्मान सोहळा विक्रम सेन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पत्रकार […]
बारामती ! फलटण तालुक्यातील एकावरती वडगाव निंबाळकर येथे बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.
प्रतिनिधी – फिरोज भालदार फलटण येथील युवकाचे बारामती तालुक्यातील एका युवतीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केले प्रकरणी फलटण येथील तरुणावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही शीक्षण घेत असताना आरोपी गौरव आदेश निंबाळकर यांची ओळख झाली […]
बारामती येथे भारतीय पत्रकार संघातर्फे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन
प्रतिनिधी- बारामती येथील दूध उत्पादक संघाच्या सभागृहात येत्या रविवारी ( १०ऑगस्ट ) भारतीय पत्रकार संघ बारामती विभागातर्फे पदग्रहण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांनी दिली. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन हे असणार […]
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रूग्णांना ५५ कोटींची मदत
प्रतिनिधी. , दि. ६ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः पुणे विभागात मागील सात महिन्यामध्ये रूग्णांना तब्बल ५४ कोटी ९१ लाख ३७ हजार रूपयांची मदत दिली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. […]
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता
प्रतिनिधी. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹१५०० मासिक मदत जमा केली जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. […]
बारामती ! श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर वडगाव निंबाळकर मध्ये उत्साहात संपन्न ; शिबिरामध्ये ९१५ नागरिकांनी घेतला शासकीय सेवेचा लाभ .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यात सर्वत्र महसूल सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथे महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत विविध विषयांवरती श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर , वडगाव निंबाळकर सरपंच सुनील ढोले, उपसरपंच […]
घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षित अल्पवयीन सराईत गुन्हेगारास अटक
प्रतिनिधी – युनिट-४ गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २ गुन्हे उघडकीस, २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे शहरातील युनिट-४ गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या एका विधीसंघर्षित अल्पवयीन गुन्हेगारास अटक करत ०१ दुचाकी व ०१ रिक्षासह एकूण ₹२.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत २ गुन्हे उघडकीस आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट-४ कडून […]
लोकनेते कै. बाबालालजी काकडे देशमुख पुण्यतिथी निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय, निंबुत यांच्या वतीने दिनांक ३ऑगस्ट २०२५ रोजी असणाऱ्या लोकनेते कै. बाबालाल काकडे देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे १ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन विद्यालयात करण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवार दि.४ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाला. या वर्षी सलग आठव्या वर्षी आयोजित […]
खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री होत असल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन
पुणे, दि. २: खत कंपन्या शेतकऱ्यांना खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने विक्री करत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. अशा प्रकारे विभागातील पुणे, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यातील खत कंपन्या सक्तीने विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. कृषी निवेष्ठांच्या लिंकिंग संबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी […]
डोर्लेवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वृक्षारोपण करून साजरी.
प्रतिनिधी. डोरलेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ.सुप्रियाताई नाळे यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व नंतर गावातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपनाचा कार्यक्रम झालेनंतर ग्रामपंचायत कार्यालयात सर्व मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे […]