Home

1 min read

ऊस पाचट कुजविण्याची प्रक्रिया करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रतिनिधी    शेतकऱ्यांना ऊसाच्या पाचटाचे महत्व पटवून देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मागील २ वर्षापासून ‘ऊस खोडवा उत्पादन व पाचट व्यवस्थापन अभियान’ राबविण्यात येत आहे, ऊसाचे पाचट कट्टी करून कुजविल्यानंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट न जाळता त्यावर कुजविण्याची प्रक्रिया करण्याची करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी यांनी केले आहे. बारामती कृषी […]

1 min read

*थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ*

प्रतिनिधी. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय […]

1 min read

लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक

प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याच्या बतावणीने चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हडपसर भागात ही घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत. तीन दिवसांपूर्वी त्या सकाळी अकराच्या सुमारास हडपसर भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना […]

1 min read

रानकवी जगदीप वनशिव यांना काव्य प्रतिभा पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित पाली मराठी भाषेचे .शब्दकोशाकार लोकशिक्षक बाबा भारती यांच्या जन्मशताब्दी निमित्त वार्षिक शब्द उत्सव सातवा उपक्रम जीवनगौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षीचा राज्यस्तरीय लोकशिक्षक बाबा भारती काव्य प्रतिभा पुरस्कार निवेदक लेखक पत्रकार अभिनेते गीतकार व्याख्याते समीक्षक रानकवी जगदीप वनशिव यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती […]

1 min read

आईवडील दगावले, दोन वर्षाचा चिमुकला बचावला…शिवशाही अपघातात जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू

प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यातील डव्वा येथे झालेल्या शिवशाही बसच्या भीषण अपघातात अनेकांनी आप्तस्वकीयांना गमावले आहे. या अपघातात भंडारा जिल्ह्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजारी नातेवाईकांना पाहायला जात असलेल्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आणि दोघांनीही या अपघातात प्राण गमावले. मात्र त्यात त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला बचावला. पिपरी पुनर्वसन गावातील राजेश देवराव लांजेवार (३८) आणि […]

1 min read

कोल्हेवाडीत भरदिवसा तरुणाचा खून, आर्थिक वादातून खून झाल्याची माहिती

प्रतिनिधी सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात तरुणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. भरदिवसा तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हवेली पोलिसांकडून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश सुदाम थोपटे ( वय ३८, सध्या रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी खडकवासला, मूळ रा. खानापूर, ता. हवेली: असे खून झालेल्या तरुणाचे […]

1 min read

मंगळवार ठरला घातवार, तीन अपघातात चार ठार

प्रतिनिधी नागपूर शहर आणि ग्रामीण भागात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार हा घातवार ठरला आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत, मंगळवारी सकाळीच दहा वाजता सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी जाणारी बस उलटल्याने एक विद्यार्थिनी जागीच ठार झाली तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी […]

1 min read

निंबुत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी. सकाळी नऊ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथे मिलिंद तरुण मंडळ निंबुत यांच्यावतीने संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देशाने संविधान स्वीकारल्याचे 75 वर्ष आज पूर्ण झाले. महामानव डॉ. बॅरिस्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी निंबुत गावचे उपसरपंच अमरदीप चंद्रशेखर काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार छगनराव […]

1 min read

मु. सा काकडे महाविद्यालयामध्ये अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा

प्रतिनिधी   आज मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयामध्ये अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा करण्यात आला. चालू वर्षी आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारल्याचे 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे […]

1 min read

मु. सा काकडे महाविद्यालयामध्ये अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा

प्रतिनिधी. आज मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयामध्ये अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा करण्यात आला. चालू वर्षी आपल्या भारत देशाने संविधान स्वीकारल्याचे 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख […]