Home
नींबूत येथे मोहरम सन उत्साहात साजरा
नींबूत तालुका बारामती येथे सालाबादप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम हा सण उत्साहात पार पडला इस्लाम धर्मानुसार मोहरम हा मुसलमान समाजाचा वर्षारंभ आहे या महिन्यांमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन व हुसेन धर्माच्या प्रचारासाठी निघाले असता त्यांना करबलाच्या मैदानात त्यांच्या शत्रूंनी शहीद केले म्हणून त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून मोहरम हा सण ताबूत […]
अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या
प्रतिनिधी कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांनी केलेली मद्य पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच येरवडा भागात एका १६ वर्षीय मुलीने मैत्रिणीसोबत घरी पार्टी केली. पार्टीनंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रिण बेशुद्धावस्थेत सापडली. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास […]
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त.
पुणे दि.१६: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया वेगाने राबविली जात असून आतापर्यंत १ लाख ३३ हजार ऑफलाईन आणि सुमारे ७५ हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती विमानतळ येथे स्वागत
बारामती, दि.१६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी आमदार राहुल कुल, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, […]
श्री बा.सा.काकडे देशमुख विद्यालय पिंपरे येथे श्री अभिजीत काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.
प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक हे नेहमीच आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत करीत असतात इतर वेळी ही परिसरातील कोणत्याही विद्यार्थ्यास काही शिक्षणाकरता अडचणी असल्यास सढळ हाताने मदत करणे हा त्यांच्या स्वभावातला विशेष गुण आहे. श्री अभिजीत काकडे यांच्या आज वाढदिवसाचे औचित्य साधून श्री बाबा लाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द […]
काकडे महाविद्यालयात वाहतूक नियमांविषयी जाणीव जागृती
प्रतिनिधी. सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालय व महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे ,सचिव श्री सतीशराव लकडे, महालक्ष्मी ड्रायव्हिंग स्कूल चे […]
संत निरंकारी मिशनद्वारा रुपीनगर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच रुपीनगर येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, १४ जुलै २०२४ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये ३०१ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये संत निरंकारी रक्तपेढी मुंबई आणि वाय सी एम रक्तपेढी यांच्या मार्फत रक्त […]
ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना*
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते, त्यानुसार या योजनेचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा […]
24 तास श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच दर्शन
🙏 राम कृष्ण हरी🙏 पंढरपूर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी खालील फोटो वरती क्लिक करा ⬇️ 🙏 राम कृष्ण हरी🙏
बारामती ! होळ येथे विजेच्या शॉक बसल्याने तरुणाचा मृत्यू
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील होळ गावामध्ये विजेचा शॉक बसून हनुमंत सुनील सुर्यवंशी वय २५ वर्षे रा. होळ या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास घडली . मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत सुर्यवंशी हा होळ येथे विजेच्या डीपीचा झालेला घोटाळा काढत होता यावेळी त्याला शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजत आहे . […]