मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 22 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

बारामती तालुक्यात भारतीय पत्रकार संघाकडून पत्रकार दिन साजरा.

mnewsmarathi 06 Jan 2026 1 मिनिट वाचन 9,903 वाचन

प्रतिनिधी.

भारतीय पत्रकार संघ, बारामती तालुका यांच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकारितेचे सामाजिक दायित्व, लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका आणि सत्यनिष्ठ वृत्तलेखन यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांनी निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि लोकहितासाठी काम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. बदलत्या काळात माध्यमांसमोर असलेली आव्हाने, डिजिटल पत्रकारितेची जबाबदारी आणि विश्वासार्हतेचे महत्त्व यावरही चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पोलीस हवालदार रमेश नागटिळक, कडवळे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी रमेश नागटिळक यांनी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी भारतीय पत्रकार संघातील सर्व अधिकारी पदाधिकारी सन्माननीय सदस्य उपस्थित होते. सर्वांनी
पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi