प्रतिनिधी.
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान संशयीत बिना नंबर प्लेट मोटार सायकल व दुसरी त्याचा सोबतची एक मोटरसायकल थांबवून चौकशी केली असता, बिना नंबर प्लेट मोटरसायकल चां चेसी व इंजिन नंबर वरून माहिती घेतली असता, शिरवळ पोलीस स्टेशन जि. सातारा गुन्हा रजि. नं. ४५५/२०२५ यातील असल्याचे निष्पन्न झाली त्यांनतर या दोन संशयित मोटरसायकल वरील संशयीतांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता १) विलास मोतीलाल हरजिन वय २४ वर्षे रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा २) करण विष्णु पवार वय २४ वर्षे रा. शेरे ता. जि. सातारा ३) लखन मोहन पवार वय २५ वर्षे रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा ४) एक अल्पवयीन बालक असे सांगितले. यांचा बाबत अधिक ची माहिती घेतली असता यापूर्वी मोटरसायकल चोरीचे व इतर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.
सराईत गुन्हेगारांच्या चौकशीत त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतून बऱ्याच मोटार सायकल चोरीची कबुली दिल्याने ते सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना पुढील तपास करीता शिरवळ पोलीस स्टेशन पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार रमेश नागटिळक, पोलीस हवालदार भाऊसाहेब मारकड, पोलीस अंमलदार आबा जाधव, निलेश जाधव यांचे पथकाने केली आहे.
















