Image

काकडे महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर – येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये कै. मुगुटराव साहेबराव काकडे – देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. नितीन लगड वाघिरे महाविद्यालय सासवड, यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे उपस्थित होते.
यावेळी डॉ.लगड यांनी वक्तृत्व ही एक कला आहे, त्यामध्ये नवरसाचा योग्य वापर केला तर वक्तृत्व बहरते, तसेच आजच्या तरुण पिढीमध्ये वाचनाचे महत्त्व कमी झाले आहे, वाचनाने वक्तृत्व समृद्ध होते, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, तसेच बौद्धिक क्षमता विकसित होतात. असे विचार त्यांनी मांडले त्याचबरोबर ही स्पर्धा खूप जुनी व नावाजलेली आहे व या स्पर्धेतून नामांकित वक्ते निर्माण झालेले आहेत. तसेच या स्पर्धेचे विषय दर्जेदार व चालू घडामोडीशी निगडित असल्याने विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वामध्ये त्यांच्या भौतिक क्षमताचा कस लागतो, तसेच या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक राज्यातील विविध भागातून आल्यामुळे, भविष्यामध्ये त्या त्या विभागाचे व्यासपीठ गाजवतील यात मला शंका वाटत नाही असे विचार मांडले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी आपल्या मनोगता मध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुगुटराव आप्पा हे नावाजलेले वक्ते होते आणि म्हणूनच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही वक्तृत्व स्पर्धा सुरू केली आहे. सहकारातील महामेरू म्हणजेच मुगुटराव आप्पा आहेत, असे आपल्या मनोगत मध्ये सांगून उपस्थितांचे स्वागत केले.
या स्पर्धेमध्ये एकूण २७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये नव महाराष्ट्र विद्यालय पण्दरे ची विद्यार्थीनीं संस्कृती संजय जगताप हिने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या शुभहस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ.शेळके यांनी आपल्या मनोगता मध्ये वक्तृत्व स्पर्धा ही तरुण वर्गाला एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करणारी स्पर्धा आहे. तसेच एखादा विषय सादर करीत असताना एका लय मध्ये तो विषय सादर केला तरच वक्तृत्व चांगले होते. तसेच अशा स्पर्धा मधून व्यवस्थेला प्रश्न विचारणारे वक्ते तयार व्हावेत तरच अशा स्पर्धा यशस्वी होतील असं मत मांडले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. आनंदा गांगुर्डे, व प्रा. डॉ. प्रभाकर घोडके यांनी जबाबदारी पार पाडली, याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री सतीश लकडे, सर्व विभागाचे उपप्राचार्य,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रा.जे.एन.खोमणे यांनी प्रास्तविक केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. कल्याणी जगताप यांनी मानले.
स्पर्धेमधील विजेते पुढीलप्रमाणे अनुक्रमे, प्रथम संस्कृती संजय जगताप (नव महाराष्ट्र विद्यालय पण्दरे), द्वितीय कार्तिक ज्ञानेश्वर दराडे (पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर जि . लातूर), तृतीय वैष्णवी नागवडे (सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे),, उत्तेजनार्थ यशराज आप्पा हेगडे (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सायन्स सातारा).

Releated Posts

निंबुतमध्ये संत सोपानकाका पालखीचे उत्साहात स्वागत; लेझीमच्या तालावर संविधानाचा जागर!

​दि. १४ जुलै संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दुपारी ठीक ५:०० वाजता निंबुत गावामध्ये अत्यंत भक्तीमय…

ByBymnewsmarathi Jul 14, 2026

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश.

पालखी महामार्गावरील अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट ; जखमींवर मोफत उपचार करण्याचे सूचना देऊन मृतांच्या…

ByBymnewsmarathi Jul 13, 2026

श्री संत तुकाराम महाराज व श्री संत सोपानकाका महाराज पालखी स्वागतासाठी बारामती सज्ज-नगराध्यक्ष सचिन सातव

पालखी सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-मुख्याधिकारी पंकज भुसे बारामती, दि. ११: श्री संत तुकाराम महाराज पालखीचे…

ByBymnewsmarathi Jul 11, 2026

बारामती! वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम संत गतीने चालू? ; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे यावरती दुर्लक्ष.

प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत प्रशासनाकडून बंगला झोपडपट्टी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीच्या खोलीकरणाचे काम चालू झाले आहे…

ByBymnewsmarathi Jul 8, 2026