• Home
  • ताज्या बातम्या
  • सामाजिक एकतेचा सुंदर नमुना : आगवणे कुटुंबीयांना निंबुत समाजसेवा व्हॉट्सॲप ग्रुपची आर्थिक मदत.
Image

सामाजिक एकतेचा सुंदर नमुना : आगवणे कुटुंबीयांना निंबुत समाजसेवा व्हॉट्सॲप ग्रुपची आर्थिक मदत.

प्रतिनिधी.
सोशल मीडियाचा वापर कसा करावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे मदन काकडे यांचा समाजसेवा व्हाट्सअप ग्रुप गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज टाकून इतरांना इरिटेट करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे विचारधारा घेऊन जवळच्या सवंगड्यांना एकत्रित करून निंबुत मधील मदनराव काकडे यांनी अकरा वर्षांपूर्वी समाजसेवा या व्हाट्सअप ग्रुप ची स्थापना केली.
या व्हाट्सअप ग्रुप ला काहीजण मिनी विधानसभा असे देखील बोलतात होय कारणही तसंच आहे कारण या व्हाट्सअप ग्रुप वरती अनेक राजकीय पक्षांचे समर्थक आहेत आणि ते आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे या ग्रुप वरती मांडतात
काही वेळा शाब्दिक वाद विवाद देखील होतात अगदी विधान भवनामध्ये होतात तसेच.
मग अशावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मदनराव काकडे तो ग्रुप काही वेळासाठी ॲडमिन सेटिंग करून ठेवतात. अशाप्रकारे या ग्रुपचं काम चालू राहते मात्र सामाजिक बांधिलकी जपायचे भावना डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत कार्य देखील केले गेलेले आहे. सांगायचं झालं तर.
जगाला आपल्या दहशतीखाली बंद खोलीत कोंडून ठेवलेला कोविड सारखा महामारीचा आजार आल्यानंतर याच समाजसेवा ग्रुपने अकरा कोविड सेंटर ला मदत.
मराठवाड्यामध्ये पूर आल्यानंतर पूरग्रस्तांना, कोल्हापूर पाटन या ठिकाणी देखील या व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने मदत पोहोचवण्यात आली. अशाच या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य खरंतर तेही प्रत्येक कार्यात ग्रुपच्या बरोबरीने नेहमीच असायचे ते कैलासवासी हनुमंतराव आगवणे यांचं काही दिवसापूर्वी इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे निधन झाले आणि संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली.
मग अशावेळी मागे राहील तो समाजसेवा ग्रुप कुठला या ग्रुपच्या ॲडमिन यांनी ग्रुप वरती एक मेसेज केला आपल्या ग्रुपचे सदस्य हनुमंत आगवणे यांना आपण आर्थिक मदत करूया आणि बघता बघता जवळपास 80 हजार रुपये रोख रक्कम व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील असणाऱ्या सदस्यांकडून जमा झाली.
आज त्या रकमेची दहा टक्के व्याजदराने एफडी करून आगवणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केली.या प्रसंगी समाजसेवा ग्रुप चे पिएल निगडे,टि के जगताप,महेशआण्णा जेधे,रामदास राऊत,किरनजी सुर्यवंशी अजित काकडे अमर काकडे विक्रम काकडे भाऊसो कोळेकर. उपस्थित होते.
तसेच सोमेश्वर येथील समर्थ कॉम्प्युटरच्या वतीने आगवणे यांच्या दोन्ही मुलांसाठी MS-CIT कोर्सच्या फी मध्ये 50% सवलत देणार असल्याचे समर्थ कॉम्प्युटरचे मालक योगेश यादव यांनी जाहीर केले.
तसेच सतीश भैय्या कल्याणकारी संघनिंबुत यांच्यावतीने आगवणे यांच्या मुलीचे दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत करून देणार असल्याचे जाहीर केले. खरंतर या whatsapp ग्रुप च्या वतीने दशकपूर्ती सोहळा देखील साजरा केला होता यावेळी समाजसेवा व्हाट्सअप ग्रुपच्या सर्व सन्माननीय सदस्यांना एकत्रित करून स्नेहभोजनाचा आनंद व्हाट्सअप ग्रुप चे ॲडमिन यांनी घडवून आणला.
आणि आजही या समाजसेवा व्हाट्सअप ग्रुप कडे 15000 रुपये निधी शिल्लक असल्याचे ग्रुपचे ॲडमिन मदनराव काकडे यांनी सांगितले. अशा या कार्यामुळेच समाजसेवा व्हाट्सअप ग्रुप ची आज समाजामध्ये चांगली प्रतिमा असल्याचे पाहायला मिळते.
खरंतर अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये चुकून अशा काही घटना घडल्यास समाजातील व्हाट्सअप ग्रुपने समाजसेवा ग्रुप चा आदर्श घेऊन असे कार्य नक्कीच हातात घ्यावे.

Releated Posts

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न.

प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्र या आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर…

ByBymnewsmarathi Feb 28, 2026

महाराष्ट्र शासन करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल रामेश्वर मोरे यांचा उद्योग मंत्र्याच्या हस्ते मुंबईत गौरव

प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने…

ByBymnewsmarathi Feb 26, 2026

निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून वडगाव निंबाळकर पोलिसांनी 3,59,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद प्रकाश नवले…

ByBymnewsmarathi Feb 25, 2026

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात पाककला उपक्रम उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात आज वार शनिवार दिनांक २१/ ०२ /२०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026