• Home
  • क्राईम
  • कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
Image

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचा २३ वर्षांचा मुलगा कामावरून घरी परतला, तेव्हा ही माहिती समोर आली.

रात्रपाळी संपवून घरी आलेल्या मुलाने बराच वेळ दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. घरामध्ये त्याचे आई-वडील बेशुद्ध अवस्थेत आढळले, त्यानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रकाश मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे अशी या मृत दांपत्याची नावे असून प्रकाश मुंडे हे चालक म्हणून काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरी मुंडे या मागील एक वर्षापासून ब्रेन ट्यूमर या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. या आजारपणामुळे मृत्यू झाला का? की इतर काही कारण आहे. याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. सध्या तरी येवलेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध सध्या सुरु आहे. एकाच वेळी पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणात घरातील इतर सदस्यांचे जबाब नोंदवून घेत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026