• Home
  • माझा जिल्हा
  • यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली
Image

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी

बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७ ते २४ जानेवारी या कालावधीत प्रदर्शन होणार आहे.

यंदा कृषक चा कालावधी वाढला असून आठ दिवस प्रदर्शन भरवले जाणार आहे. कृषिक’ हे जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन यंदा आपल्या ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

१७० एकर प्रक्षेत्रावर प्रदर्शन भरणार असून दरवर्षी देशभरातून अडीच ते तीन लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते (दि.१७) रोजी उद्घाट्न होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, रोहित पवार यांची उदघाटनाला उपस्थिती असेल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे सीईओ निलेश नलावडे उपस्थित होते.

एआयवर सुरू उसाची उत्सुकता

यंदाच्या कृषी प्रदर्शनात AI तंत्रज्ञान आधारित सुरु उसाचे २०० टन तर खोडवा उसाचे १५० टनाचे प्रत्येशिक शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे. शेतकऱ्यांना देश विदेशातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, निविष्ठांच्या माहितीचा खजिना, विविध पिकांचे प्रात्यक्षिके पाहण्याची संधी कृषकच्या माध्यमातून मिळणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी केले आहे. आतापर्यंत २० लाख शेतकऱ्यांनी कृषिकला भेट दिल्याची नोंद आहे.

विज्ञानाची जोड दिल्यास शेती समृद्ध

राजेंद्र पवार म्हणाले, केव्हीके बारामतीचा एआय ऊस शेती प्रकल्प दाखवितो की, परंपरेला विज्ञानाची जोड दिल्यास शेती समृद्ध, आधुनिक आणि टिकाऊ होऊ शकते. हा प्रकल्प केवळ तांत्रिक प्रयोग न राहता, भारताच्या कृषी भविष्याची दिशा ठरविण्यास आदर्श मॉडेल ठरत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील रचलेला हा एक नवा इतिहास उलगडून पाहण्याची संधी यंदा कृषिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रदर्शनातील लक्षवेधी उत्पादन, प्रात्यक्षिके

– उसाचे प्रतिएकर दोनशे टन उत्पादन व खोडव्याचे दीडशे टन उत्पादन

-नावीन्यपूर्ण फळझाडांची लागवड, ५०० ग्रॅमपर्यंतचा कांदा

– विविध पिकांची प्रात्यक्षिकांची रेलचेल

-हायड्रोफोनिक भाजीपाला तंत्रज्ञान, कलमी भाजीपाला

-विविध रंगातील स्वीटकॉन, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके

– रोबोटिक तन नियंत्रण, स्वतंत्र पशुदालन, भरडधान्य, कृषी संशोधन

-बियाणे, अवजारे क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉल हार्वेस्टींगसह कापणी यंत्रे,

-प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ड्रीप, टिश्यूकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026