कंपनीतील कामगारांवरती स्वातंत्र्यदिना दिवशीच का आली उपोषणाला बसण्याची वेळ? कामगारांच्या प्रपंचात विष कालवणारा काळा बोका नक्की कोण?

माझा जिल्हा

संपादक- मधुकर बनसोडे

कामगार हा कंपनी किंवा इतर कार्यालयातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतो म्हणजेच कामगार हा कंपनी किंवा कार्यालयातील कणा मानला जातो कामगार जर कंपनीमध्ये नसेल तर कंपनी चालूच शकत नाही आणि कामगाराला आपले घर चालवायचे म्हटले तर कामगाराला वेतन मिळणे आवश्यक असते परंतु कामगाराला वेतन भेटले नाही तर कामगाराचे घर चालत नाही आणि कामगाराचे घर चालले नाही तर कामगार चालू शकत नाही आणि कामगार चालू शकत नाही तर कंपनी सुद्धा चालू शकत नाही कंपनी चालू शकत नाही तर देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकत नाही म्हणून कामगाराला आपल्या कामाचा मोबदला हा निश्चित केलेल्या वेळेत देणे अत्यंत महत्त्वाचे असते.

 इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर कंपनी ही फार जुनी कंपनी असून येथील कामगारांना स्वातंत्र्यदिना दिवशी स्वतःच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागले ही खरंतर शोकांतिका कंपनीकडे गेल्या कित्येक वर्षापासून कामगारांचे थकीत देणे आहेत ते कमी की काय त्यात कंपनीने मागील तीन महिन्यांचे कामगारांचे वेतन अद्यापही दिलेली नाही जगावं कसं आता प्रश्न या कंपनीतील कामगारांसमोर पडलेला आहे.

 वेळची वेळेला पगार होत नसल्यामुळे कामगारांच्या कुटुंबावरती उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे पगारच नसल्यामुळे कोणाच्या मुलीचे शिक्षण थांबलेले आहेत तर कोणाच्या मुलीचे लग्न थांबलेले आहे कामगारांच्या प्रपंचात विष घालवणारा काळा बोका नक्की कोण आहे असा प्रश्न कामगारांच्या कुटुंबाला पडला आहे.

 आमच्या प्रतिनिधीने कामगारांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कामगारांच्या कुटुंबातील व्यक्तींना अश्रू अनावर झाले जगावं की मरावं अशी भावना कामगारांच्या कुटुंबांनी व्यक्त केली आणि कामगारांना काही आजार आहेत त्या महिन्याच्या गोळ्या घेण्याकरता देखील त्या कामगाराकडे पैसे नाहीत बाजारपेठेत उदार मागाय गेलं तर कंपनीतील कर्मचारी असल्यामुळे कोणीही उदार देखील देत नाही मग आम्ही आमच्या कुटुंबचा उदरनिर्वाह कसा याचे उत्तर कंपनी प्रशासनानेच द्यावी असे देखील कामगारांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले.

भारताच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी एकीकडे देशाचे पंतप्रधान हे देशाची अर्थव्यवस्था ही जगाच्या तिसऱ्या क्रमांकावर आले असल्याने प्रशंसा करत आहेत तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर मधील वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे कामगार उपोषणाला बसले आहेत तर देशाचे पंतप्रधान म्हणतात की देशाचे अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते परंतु कंपनीमधील कामगारच उपोषण करत असतील कामगारांना न्याय मिळत नसेल कामगारांना पुरेसे वेतन मिळत नसेल तर खरंच आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते का?

वेतन कायदा, 1963 च्या कलम 4 मध्ये मजुरीचा कालावधी निश्चित केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कलम 3 नुसार वेतन देण्यास जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती ज्या रकमेच्या संदर्भात मजुरीचा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त नसावा, मजुराला त्याची मजुरी एका महिन्याच्या आत मिळावी. असे प्रशासनाने आपल्या अधिनियमामध्ये सांगितले आहे परंतु हे अधिनियम खरंच सर्व कार्यालय काटेकोरपणे पाळत आहेत असे निदर्शनास येत नाही? सामान्य नागरिक जर कायदा आणि सुव्यवस्था भंग करत असेल तर त्याच्या वरती कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा दिली जाते परंतु मोठ्या कंपन्या किंवा पैशावाल्या नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था भंग केली तर प्रशासन याकरती कानाडोळा करते का? सर्व कायदे सर्व अधिनियम हे सर्वांसाठी लागू होतात का? जर सर्वांसाठी लागू होत असतील तर देशाच्या आर्थिकतेचा कणा म्हणून ओळखला जाणारा कामगार हा अन्यायग्रस्त का?