Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण
Image

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण

प्रतिनिधी

पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीतील रहिवासी आहे. तरुण आणि त्याची पत्नी मजुरी करतात. ते फिरस्ते आहेत. तरुणाची पत्नी आजारी आहे.

तरुण आणि त्याची पत्नी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील आरक्षण केंद्र परिसरात थांबले होते. त्यांच्याबरोबर तीन वर्षांचे बालक होते. पत्नीला घेऊन तरुणाला दवाखान्यात जायचे होते. आरक्षण केंद्र परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाले तपास करत आहेत.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026