• Home
  • क्राईम
  • खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
Image

खळबळजनक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

प्रतिनिधी

अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीस बळजबरीने दुचाकीवर बसवून गावाबाहेरील एका लॉज वर नेत शारीरिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मेहकर परिसरात घडली आहे. यामुळे समाजमन हादरले आहे.

पीडिता शाळेत जात असताना आरोपी नेहमीच तिचा पाठलाग व बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची बालिकेवर वाईट नजर होती. घटना प्रसंगी त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने तिला धमक्या देत बळजबरीने मोटरसायकलवर बसवून गावाबाहेर बायपास वरील निवांत लॉजवर नेले.

एका खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरोधात शारीरिक अत्याचार केले. याची वाच्यता कुठे केली तर ठार मारण्याची धमकीही दिली. पीडितेच्या तोंडी तक्रारी वरून मेहकर पोलिसांनी आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण, (वय २० राहणार खंडाळा, तालुका मेहकर )तसेच ओम प-हाड (२०, रा. बाभुळखेड, ता. मेहकर) या दोघांविरोधात पोक्सो, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेचे गंभीर्य आणि पोकसो, ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी नुसार या दुर्देवी घटनेचा तपास मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहे. या घटनेमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Releated Posts

कोंढव्यात पती-पत्नीचा राहत्या घरी मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथील श्रद्धानगर परिसरात एका ५२ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या ४८ वर्षीय पत्नीचा त्यांच्या राहत्या घरी…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

पेट्रोलिंगमध्येच उघडकीस आली मोटारसायकल चोरीची टोळी, सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत निंबूत बारामती रोडवर निंबूत गावचे हद्दीत निंबुत छप्री कॅनॉल येथे पेट्रोलिंग दरम्यान…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलीसानी शेतकऱ्यांच्या शेळ्या व बोकड चोरणाऱ्या तिन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सदोबाचीवाडी गावाचा हद्दीतील इनामवस्ती होळ रोड येथील तक्रारदार नामे संजय जगन्नाथ…

ByBymnewsmarathi Jan 5, 2026

श्रीरामपूरमध्ये भरदिवसा गोळीबार; बंटी जहागीरदार यांचा मृत्यू

प्रतिनिधी श्रीरामपूर शहरात बुधवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंटी (असलम शब्बीर) जहागीरदार यांच्यावर…

ByBymnewsmarathi Jan 1, 2026