• Home
  • क्राईम
  • महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
Image

महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक

प्रतिनिधी

लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मेफेड्रोन बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. कोळसे गल्लीतील एका दुकानात कारवाई करुन त्यांच्याकडून १५ लाख ७० हजार रुपयांचे ७७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

हुसेन नुर खान (वय २१) , फैजान अयाज शेख (वय २२, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फैजान याचे महात्मा गांधी रस्त्यावरील कोळसे गल्लीत कुलूप विक्रीचे दुकान आहे. शहरात छुप्या पद्धतीने मेफेड्रोनची तस्करी आणि विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागातून पोलिसांनी २३ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले होते.

कोळसे गल्लीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनचा साठा करुन ठेवल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी विशाल दळवी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून फैजान आणि हुसेन यांना पकडले. त्यांच्याकडून १५ लाख ७० हजार रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस कर्मचारी संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी ही कामगिरी केली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026