मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 26 March 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी या विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 26, 2025 1 मिनिट वाचन 8,510 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

.2003 /2004च्या एस.एस.सी बॅचच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मेळावा घेण्यात आला होता सदर मेळाव्याला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही शालेय प्रार्थना व परिपाठापासून झाली या कार्यक्रमांमध्ये शाळेचा परिपाठ माजी विद्यार्थ्यांनीच सादर केला. त्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले माननीय श्री बी.के.कुसेकर सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .मोहन कोकरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते विद्यालयातील शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षक माननीय श्री एम.डी पिसाळ सर तसेच गायकवाड डि.व्ही. सर हे आवर्जून उपस्थित होते. युवराज गडदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पिसाळ सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर नियमित शाळेच्या तासिका घेण्यात आल्या त्यात माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची भूमिका बजावली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन आपण करत असलेल्या कामाबद्दल नोकरी बद्दल माहिती दिली तब्बल 21 वर्षांनी सर्व विद्यार्थी एकत्र आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मनोगते व्यक्त केली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांमार्फत विद्यालयाला ग्रंथालयासाठी व प्रयोगशाळेसाठी कपाट भेट देण्यात आले तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्नेहभोजन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार गडदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामचंद्र मदने यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संजय खवळे व सुजित लकडे व इतर काही विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पार पाडले. याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांनी त्यांचे आभार मानले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख