• Home
  • माझा जिल्हा
  • श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५
Image

श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५

प्रतिनिधी.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता, आषाढी वारी-२०२५ दरम्यान वारी सुरु झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना यामुळे एक दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (एसडीआरएफ/ एनडीआरएफ) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना द्यायवाच्या मदतीचे दर व निकर्ष २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार लागू केले होते. याप्रमाणे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता मदतीचे दर असणार आहेत.

ही मदत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांकरिता अपंगत्व, इस्पितळाचा खर्चाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

ही मदत आषाढी वारी-२०२५ करिता वारी सुरु झाल्याची तारीख अर्थात १६ जून २०२५ ते वारी समाप्त होण्याची तारीख १० जुलै २०२५ दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी, सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू असणार आहे. वारीदरम्यान अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस ४ लाख रुपये, अपघात किंवा दुर्घटनेमुळे ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये आणि ६० टक्क्याहून अधिक अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये, एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल असल्यास १६ हजार रुपये तसेच एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल असल्यास ५ हजार ४०० रुपये याप्रमाणे वारकरी अथवा त्याचे वारसदारास रक्कम मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत वारकरी किंवा त्यांच्या वारसाने सानुग्रह अनुदान मागणी करण्याबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावा. संबंधित वारकरी आषाढी वारी-२०२५ करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे तहसीलदाराचे प्रमाणपत्र मदतीच्या अर्जाबरोबर जोडावे. तहसिलदारांनीही संबंधित वारकरी हे आषाढी वारी-२०२५ करिता गेल्याची खात्री करुन संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदारांच्या मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे.

राज्य शासनाकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक् मदतीबाबत संबंधितांना रक्कम मंजूर करुन वितरीत करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू, वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात सानुग्रह अनुदान मंजूर करुन वितरित करण्यात येणार आहे

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026