मुख्य मजकुरावर जा
Sunday, 20 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 05 July 2025 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

संत निरंकारी मिशनद्वारा इंदिरानगर येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन…

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
July 5, 2025 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील इंदिरानगर ब्रांच येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन चिंतामणराव देशमुख प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर या ठिकाणी रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात आले आहे. मिशनचे स्वयंसेवक आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते.
आपण मानव आहोत तर रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वानी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन इंदिरानगर प्रमुख अनंत दळवी जी यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख