श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत या ठिकाणी विपश्यना शिबिराचे आयोजन…*

माझा जिल्हा

प्रतिनिधी.
आज दि.१जुलै२०२३ रोजी श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत ता. बारामती या ठिकाणी विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .बारामती विपश्यना समितीचे सहाय्यक आचार्य श्री. ज्ञानदेव बोराटे सर आणि त्यांचे सहकारी, मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित होते .यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आनापान ,ध्यानधारणा आणि मंगल प्रार्थना यांची प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच नियमित साधनेचे महत्त्व पटवून दिले. आनापान नियमित केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत व मानसिक आरोग्यामध्ये निश्चित सुधारणा होते

असे श्री. बोराटे यांनी सांगितले .विद्यालयामध्ये हा मित्र उपक्रम दररोज १०मिनटे सकाळी परिपाठात व सायंकाळच्या प्रार्थनेत घेण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात प्रास्ताविक दिपाली ननवरे यांनी केले सूत्रसंचालन राजाराम भगत व आभार विजय सूर्यवंशी यांनी मानले. संस्थेच्या पदाधिकारी मा. अध्यक्ष सतीशराव काकडे दे.उपाध्यक्ष मा. भीमराव बनसोडे सर तसेच मानद सचिव मा.मदनराव काकडे दे. यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.