प्रतिनिधी – फिरोज भालदार
फिर्यादी सुलताना रफिक मुलानी यांचे वडील ईलाही गफुर शेख यांच्या नावे असलेले लक्ष्मी नगर येरवडा पुणे येथे सर्वे नंबर १२ येथे . येथील पूर्वीचे राहते घर फिर्यादी यांच्या वडिलांनी फिर्यादी यांचे मामा निसार शेख यांस राहण्यात दिले होते. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांनी नीसार शेख यांचा मित्र अजय पाटील ते घर भाड्याने राहण्यास दिले . त्यानंतर काही दिवसांनी अजय पाटील याची पत्नी वैशाली पाटील यानी त्यांच्या नावाचा लाईट मीटर घेतला व त्यावेळी फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांना खोली खाली करण्यास सांगितले असता देखील ते म्हणाले सदर खोली आम्हाला द्या फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांना खोली देण्यास नकार दिला.
या गोष्टीचा राग मनात धरून वैशाली पाटील व तिची ननंद यांनी दिनांक १७/ ५/ २०२३ रोजी शिवीगाळ केली त्यानंतर फिर्यादी सुलताना यांचे वैशाली पाटील यांचे विरोधात सदर घरा संदर्भात कोर्ट केस चालू असताना देखील दि. १० /६ / २०२३ रोजी २.४५ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी फिर्यादी सुलताना व त्यांच्या भावाची मुलगी नामे सिमरन शहाजान मुलानी हे दोघीजणी घरी झोपलेले असताना नामे वैशाली पाटील ,सुमित पाटील ,दिनेश पांडव ,व श्रीकांत लाकूडे यांनी सुलताना मुलानी यांचे घरचा दरवाजा वाजवून शिवीगाळ करत घराच्या बाहेर ये असे बोलून दरवाजा उघडण्यास सांगितले.
फिर्यादी सुलताना यांनी घरचा दरवाजा उघडलं नाही म्हणून आरोपी यांनी कुदळीने घराचा दरवाजा तोडला त्यावेळी त्यांच्यासोबत सुमित पाटील ,त्याची आई वैशाली पाटील, श्रीकांत लाकूड , दीणेश पांडव व काही अनोळखी महिला पुरुष यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांना सर्वजण अंगावर धाऊन गेले त्यावेळी फिर्यादी व आरोपी मध्ये झटापटी झाली. त्यावेळेस फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे २५००० /- रुपये सोन्याची चैन त्या झटापटीमध्ये गहाळ झाले. व वरील सर्व आरोपी व अनोळखी इसम यांनी फिर्यादी याचे घरातील सामान घराच्या बाहेर फेकले या सामानामध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले १००००/- रुपये हे आरोपी यांनी लबाडीचा विचाराने धरून घरातून चोरून घेऊन गेले . यावरून फिर्यादी सुलताना मुलानी यांनी वरील इसमान विरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव हे करीत आहे.