नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी.! ‘एक्सपोसॅट’च्या यशासाठी इसरोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

माझा जिल्हा

 

प्रतिनिधी

अवकाशातील वेधशाळेसह, दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छीत कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था – इसरोने आज नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इसरोच्या या ‘एक्सपोसॅट’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अभूतपूर्व यशाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इसरोचे आणि या मोहिमेत सहभागी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

विशेष म्हणजे या मोहिमेतील दहा उपग्रहांपैकी एक उपग्रह मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयाचा आहे. यासाठीही मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातील या वैज्ञानिक उपक्रमशीलतेचे कौतुक करून यात सहभागी संशोधक विद्यार्थी, अध्यापक- तज्ज्ञांचे अभिनंदन केले आहे.

‘नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इसरोने भारतीयांना एक वैज्ञानिक गिफ्ट दिली आहे. चंद्रयान – ३ मोहिम, आदित्य – एल १, गगनयान १ या लागोपाठ यशस्वी मोहिमांनी इसरोने भारतीयांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशा पाठोपाठ आता अवकाश संशोधनाला मोठी गती मिळेल. ‘एक्सपोसॅट’च्या यशाने भारतीयांचा अवकाश संशोधनातील आत्मविश्वास उंचावला आहे. या यशामागे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक आणि अवकाश संशोधनाला पाठबळ देण्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी इसरोच्या या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे, संशोधक, अभियंते, तंत्रज्ञ तसेच तमाम विज्ञान जगताचे अभिनंदन केले आहे. इसरोच्या पुढील सर्वच मोहिमांना, प्रयोगांसाठी सुयश चिंतिले आहे.