मुख्य मजकुरावर जा
Saturday, 5 September 2026

बारामती ! पणदरे येथे पशुचिकित्सक चषक क्रिकेट सामने संपन्न .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 11, 2024 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दिनांक १० मार्च रोजी पशु वैद्यकीय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघ बारामती यांच्या वतीने एकदिवसीय टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन पणदरे येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर करण्यात आले होते . या सामन्यांमध्ये बारामती सह माण, फलटण,बरड, खंडाळा, माळशिरस ,दौंड, इंदापूर, शिरूर, तालुक्यातील पशु चिकित्सक डॉक्टर आणि विविध औषध कंपन्यांनाचे विक्री प्रतिनिधी (MR) विविध मेडिकल स्टोअर्स चे मालक आदींचे संघ उपस्थित होते. हे एकदिवसीय क्रिकेट सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले . ह्या सामन्याच्या वेळी पणदरे गावाच्या पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने नागरिक हे सामने पहायला होते व त्यांनी ह्याचा आनंद लुटत आपली उपस्थिती दर्शविली .

या सामन्यांनमध्ये ऐकून बारा संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक माण तालुका संघाने पटकावला , द्वितीय क्रमांक पारितोषिक बारामती संघाने, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक इंदापूर संघ तर चौथा क्रमांकाचे पारितोषिक हे शिरूर संघाने पटकाविला आहे. यामध्ये मालीका वीर पुरस्कार माण च्या मानेंना मिळाला आणि मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज मॅडी ठोकळ यांना देण्यात आला . सर्व संघांनी आयोजक म्हणून पशुवैद्यकीय , पशुसंवर्धन, दुग्धव्यवस्थापन सेवा संघ बारामती यांचे क्रिकेट सामन्यांचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले म्हणून आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्तकृपा मेडिकल वडगाव निंबाळकर व पशुवैद्यकीय बारामती तालुका यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये डॉ.प्रवीण जगताप , डॉ.दत्तात्रय भरणे , डॉ.प्रशांत साळवे, विशाल राऊत यांनी हे सामने भरवण्यामध्ये विशेष सहभाग घेऊन हे सामने भरवण्यात आले व यशस्वी रित्या पार पाडले. यावेळी आयोजकांकडून सर्व सहभागी संघांचे सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख