काकडे महाविद्यालयात ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ हा कार्यक्रम संपन्न*

Uncategorized

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्यासाठी ‘विद्यार्थी सुरक्षा समुपदेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री सचिन काळे व अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिलीप सुतार, श्री ओमासे साहेब, श्री शेंडकर साहेब तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता भोईटे, पत्रकार विनोद गोलांडे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शकांनीआपल्या मनोगतामध्ये ,’आज तरुण मुले हे या देशाचे भविष्य आहेत, या तरुण मुलांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आजच्या तरुणांनी कोणतेही गैरकृत्य होणार नाही याचीही दक्षता घेतली गेली पाहिजे.’ त्याचबरोबर नवीन पोक्सो कायद्याचे शिक्षा, नियम व त्याची अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, आज समाजात ज्या विविध घटना होत आहेत त्या केवळ सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळेच होत आहेत असे आवर्जून सांगितले त्यासाठी मोबाईल वापराचे फायदे तोटे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगता मध्ये प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयातील विद्यार्थी सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणकोणती खबरदारी घेतली जाते. तसेच महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा आपला पाल्यच आहे अशा हेतूने विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते. ‘सोशल मीडियाचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम’ याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा‌. युवराज नरुटे यांनी केले व प्रा.राहुल खराडे यांनी आभार मानले.