Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळली; उत्तर प्रदेशातील भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल
Image

जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळली; उत्तर प्रदेशातील भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी

जादूटोण्याची भीती दाखवून महिलेकडून खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भोंदूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कृष्णनारायण तिवारी (वय ३०), अंतिमा कृष्णा तिवारी (दोघे रा. शक्तीनगर, गौंडा, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला वानवडी भागात राहायला आहे. एका परिचितामार्फत ती आरोपींच्या संपर्कात आली होती. आरोपींना घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे. काळी जादू नष्ट करण्यासाठी विधी करावा लागेल, अशी बतावणी केली. त्यानंतर तिवारी महिलेच्या घरी गेला. आरोपींनी महिला आणि तिच्या लहान मुलीला सरबत प्यायला दिले. त्यानंतर तिला गुंगी आली. आरोपींनी महिलेची मोबाइलवर छायाचित्रे काढली.

त्यानंतर आरोपींनी महिलेशी पुन्हा संपर्क साधला. महिला आणि मुलीची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करतो, अशी धमकी दिली. महिलेकडून आरोपींनी वेळोवेळी पैसे उकळले. तिच्याकडून दागिने घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026