मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 9 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

किरकोळ वादातून सांताक्रुझ येथे मित्राची हत्या, २७ वर्षीय आरोपीला अटक

mnewsmarathi 22 May 2024 1 मिनिट वाचन 4,073 वाचन

प्रतिनिधी

सांताक्रुझ येथे २७ वर्षीय तरूणाने मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली. आरोपीला त्याच्या मित्राने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. त्या रागातून आपण त्याची हत्या केल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सोमवारी आरोपीला अटक केली आहे.

अंकित शरद चव्हाण (२०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंकित हा त्याच्या दोन भाऊ आणि आईसोबत राहायचा आणि पेस्ट कंट्रोल एजन्सीमध्ये काम करत होता.अंकितचा मित्र गौरव जाधव याच्या तक्रारीवरून याप्रकरणी हत्येचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी स्वप्नील जाधव(२७) याला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे.

अंकितने आपल्याला अलीकडेच मारहाण केली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने चाकूने वार केले, असे चौकशीत आरोपी स्वप्नीलने सांगितले आहे. यावेळी गौरव जाधव हाही घटनास्थळी उपस्थित होता. अंकितला वाचवण्यासाठी गौरव धावून गेला पण त्यापूर्वी स्वप्नीने त्याच्यावर दोनवेळा चाकूने वार केले होते. गौरवने इतरांसोबत स्वप्नीलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अंकित वडील नव्हते. अंकितची आईला घटनेमुळे मानसिक धक्का बसला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi