प्रतिनिधी.
श्री बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयास जिल्हा क्रीडा विभाग पुणे याच्या वतीने विद्यालयाच्या क्रीडा मागणी साहित्य प्रस्तावावर मंजुरी देऊन 3 लक्ष रुपयाचे खेळ साहित्य प्राप्त झाले आहे. यामध्ये खेळ साहित्यात हॉलीबॉल किट, फुटबॉल,हँडबॉल किट उंच उडीचे स्टॅन्ड, कॅरम,टेनिस किट, लांब उडीचे स्टॅन्ड, भाला, खो खो ङाम, क्रिकेट किट, इत्यादी आधुनिक क्रीडा साहित्य प्राप्त झाले आहे निबूत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा श्री सतीश शिवाजीराव काकडे देशमुख तसेच उपाध्यक्ष मा श्री भिमराव बनसोडे सर तसेच संस्थेचे मानद सचिव मदनराव काकडे दे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नेवसे कैलास भैरु विद्यालयाची क्रीडा शिक्षक श्री बुनगे दत्तात्रेय विद्यालयाचे लिपिक श्री शिवाजीराव काकडे यांच्या सर्वांचे वतीने जिल्हा क्रीडाधिकारी पुणे यांचे आभार मानण्यात आले