प्रतिनिधी.
मंगळवेढा – तालुक्यातील या डोंगरगाव गावातील सद्गुरू गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयास मा. श्रीकांत पाटील सर यांसकडून पन्नास पुस्तकांचा संच भेट देण्यात आला त्याप्रसंगी ते बोलताना म्हणाले वाचन प्रेरणा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर आता आपली जबाबदारी वाढली आहे मराठी वाचा मराठी बोला मराठीतून सर्व व्यवहार करावेत तरच खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती वारसा जपण्यासाठी आपण दक्ष राहावे समाजात होणारे बदल अन् ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी माणूस व्हायचं असे प्रतिपादन केले
वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष माणदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे यांनी वाचनालयाची स्थापना कधी कशी झाली ती सांगितली प्रत्येक संचालक मंडळातील सदस्याकडून एक एक रूपया गोळा करून वाचन संस्कृती जपून ठेवली आहे लवकरच वाचनालयाचे नूतनीकरण भव्य दिव्य ग्रंथालय करण्यात येणार आहे ते लवकरच पूर्ण करण्यासाठी वाचक गावकरी सामाजिक दानशूर व्यक्ती यांच्या पुढाकाराने नक्कीच पुर्ण होईल अशी ग्वाही दिली
दलित मित्र पुरस्कार विजेते कदम गुरूजी यांचे सुपुत्र प्रा.सुभाष कदम ग्रंथपाल ज्योतिराम क्षीरसागर ग्रंथमित्र मल्हारी माळी व संचालक पठाण शिवशरण भिकण साखरे व संचालक मंडळ ग्रामस्थ हजर होते वाचनालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आप आपला अभिप्राय नोंदवहीत नोंदावला असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे डोंगरगातील सद्गुरू गाडगेबाबा वाचनालयात कार्यक्रम संपन्न झाला