Home
बारामती ! बारामती शहरासह – ग्रामीण भागात हायवा सारखे जड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसणार का ?
प्रतिनिधी – फिरोज भालदार गेल्या काही दिवसांमध्ये बारामती शहरात आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस हायवा या जड वाहनाच्या अपघात सत्राचे चे प्रमाण आता ग्रामीण भागात देखील जास्त पसरले आहे . या आपघताचे प्रमाण हे हायवा टीप्पर वाल्यांमुळे जास्त होत असल्याचे चित्र दिसत आहे . हायवा वाले आपल्या वाहनावर व स्वतावर नियंत्रण ठेवतच नाही . यामध्ये आता […]
उस गाळप हंगाम सन २०२३-२४ मध्ये सभासदांच्या उस गाळपास प्राधान्य देणे तसेच सभासदांना दिपावली निमित्त तात्काळ ३० किलो साखर वाटप करण्यात यावा, अन्यथा उपोषण व मोर्चा काढण्यात येईल.
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांना हंगाम २०२३-२४ चा मोळी पुजन कार्यक्रम नुकताच पार पडला असून १ नोव्हेंबर पासुन उस गाळपास सुरूवात होणार आहे. तरी शेतकरी कृती समितीच्या वतीने कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळास आवाहन करण्यात येत आहे की कारखान्याने सभासदांच्या सातव्या महिन्यातील अडसाली लागणीचे संपुर्ण गाळप केल्या शिवाय बाहेरील एक टन ही गेटकेन […]
घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
प्रतिनिधी. मुंबई, दि. २६:- ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात […]
पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर* *लासलगाव आणि बारामती बाजार समितीचा प्रथम क्रमांक*
प्रतिनिधी. राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची सन 2022 -23 या आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर […]
*पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२३-२४ आंबिया बहारमध्ये डाळिंब, केळी व आंबा या फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून […]
सोमेश्वरचे चेअरमन यांनी मु.सा. काकडे कॉलेज बाबत स्वतः आत्मपरिक्षण करावे :- श्री सतिशराव काकडे
प्रतिनिधी काही दिवसांपुर्वी सोमेश्वरच्या चेअरमन यांनी वर्तमान पत्रामधुन मु.सा. काकडे कॉलेज बाबत वक्तव्य केले होते. की जी बाब न्यायालयीन असताना देखील राजकिय हेतुने कृती समितीने विचारलेल्या प्रश्नांवर स्वतःकडे कोणतीही उत्तरे नसल्याने वारंवार हेच कारण पुढे करून स्वतःच्या चुका झाकण्यासाठी कॉलेजचा मुद्दा जाणीव पुर्वक प्रसारमाध्यमांसमोर आणुन न्यायालयाचा अवमान करीत आलेले आहेत. भविष्यात त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्या […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून* *राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा*
प्रतिनिधी. मुंबई, दि. २३ : यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटं तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या […]
बारामती ! वडगाव निंबाळकर स्वातंत्र्य विद्या मंदिर मधील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेत यश .
प्रतिनिधी – फिरोज भालदार श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे, या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगांव निंबाळकर मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असून सदर विद्यार्थ्यांची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये उतीर्न झालेल्या 17 वर्षे वयोगट मुली – 1.कु.अनिता लालासो ठोंबरे-200 मीटर […]
*मु. सा. काकडे महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती’ (Research Methodology) या विषयावर ‘एक दिवसीय कार्यशाळा संपन्न’*
सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये संशोधन पद्धती (रिसर्च मेथोडोलॉजी) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे आयोजन मुख्यतः महाविद्यालयातील पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमामध्ये विशेषता पदव्युत्तर आणि संशोधन केंद्र यामध्ये संशोधन पद्धती हा विषय बंधनकारक करण्यात आलेला आहे. महाविद्यालयामध्ये एम. ए., एम. […]
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. मराठा समाजातील भावांनो टोकाचे पाऊल उचलू नका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन*
प्रतिनिधी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच राज्य सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे सांगितले. ठाणे येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मराठा […]