मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 22 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 27 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! बारामती शहरासह – ग्रामीण भागात हायवा सारखे जड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसणार का ?

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 27, 2023 1 मिनिट वाचन 8,524 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

गेल्या काही दिवसांमध्ये बारामती शहरात आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस हायवा या जड वाहनाच्या अपघात सत्राचे चे प्रमाण आता ग्रामीण भागात देखील जास्त पसरले आहे . या आपघताचे प्रमाण हे हायवा टीप्पर वाल्यांमुळे जास्त होत असल्याचे चित्र दिसत आहे . हायवा वाले आपल्या वाहनावर व स्वतावर नियंत्रण ठेवतच नाही . यामध्ये आता काही दिवसापूर्वीच बारामती मध्ये दोन अपघात तसेच वडगाव निंबाळकर मध्ये एक अपघात घडल्याची घटना घडली आहे. तेजस कासवे या नावाच्या मुलाचा बारामती प्रशासकीय भवन समोर हायवा ने दिलेल्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यु झाला . यामध्ये या हायवा व चालकावरती गुन्हा दाखल झालेला आहे . त्याचप्रकारे वडगाव निंबाळकर या ठिकाणी हायवा टिप्पर या चालकांचे आपण कोठे वाहन चालवत आहोत आणि कसे चालवत आहोत याचे भानच राहत नाही.

पाच दिवस अगोदर वडगाव निंबाळकर येथे होळ चौकामध्ये हायवा – टू व्हीलर वाल्याचा अपघात झाल्याची घटना घडली . यामध्ये टू व्हीलर वाल्याने हेल्मेट परिधान केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही . याच प्रकारे वडगाव निंबाळकर याठिकाणी व निरा बारामती रोडवर अशाच प्रकारे छोटे-मोठे हायवा हे कच , वाळू, मुरूम , डबर , माती वाहतूक चालेली असते . यामध्ये हायवा टिप्पर वाल्यांना आपण गाडी कोठे व कशी चालवावी कुठल्या ठिकाणी शाळा आहे व कुठल्या ठिकाणी चौक आहे येथे रहदारी जास्त असते या ठिकाणी आपल्या गाडीचे स्पीड किती असायला हवे याचे देखील त्यांना भान राहत नाही.

जेव्हा कुटे अपघात घडतो तेव्हा या हायवा टीप्पर वल्यांवरती गुन्हा का दाखल होत नाहीत? असा प्रश्न नागरिकांच्या मध्ये पडलेला आहे . हे हायवा टिप्पर , अशोक लेलँड ह्या वाहनांची सर्व कागदपत्रे क्लियर असतात का? जर नसले तर त्याच्यावरती काही कारवाई केली जाते का? हायवा टीप्पर वाले मुरूम ,डबर , वाळू , माती वाहण्यासाठी परवानगी घेतली जाते का ? का टीचभर रॉयल्टी काढून त्याच्याखाली आपली अवैध वाहतूक करत असतात .

बारामती मध्ये तेजस कासवे ह्या मुलाचा दुर्घटना घडली त्यावेळी काहि दिवसांपूर्ती प्रशासनाकडून हायवा टीप्पर तपासणी चालेली होती. नंतर हे दृश्य नाहीसे झाले प्रशासन देखील हे फक्त नागरिकांचे मन विचलित करण्यासाठी हे कार्य करतात का ? ह्याच्यावरती पोलिस प्रशासन काय कारवाई करणार ह्याची प्रतीक्षा नागरिक पाहत आहेत .आरटीओ व पोलिस प्रशासनाने शहरासह ग्रामीणभागा मध्ये देखील हायवा टीप्पर वाल्यांवरती बारकाईने लक्ष दिले पाहिजे असे अनेक संस्था व नागरिकांचे म्हणने आहे .

पोलीस व परिवहन विभागाने ग्रामीण भागामध्ये ड्रिंक अँड ड्राइव्ह , लायसन आणि ओव्हरलोड तपासणी विशेसता हायवा वाहनांची करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख