Home
राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ आणि शीतगृह उभारणार
प्रतिनिधी. मुंबई, दि. २२ :- राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नीदेखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ वाढविण्यात येणार आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा २४१० रुपये क्विंटल दराने नाफेड खरेदी […]
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ६६ अर्ज मंजूर*
प्रतिनिधी बारामती, दि. २२: तहसीलदार गणेश शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ६६ आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ३८ असे एकूण १०४ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. या बैठकीत तालुक्यातील नागरिकांनाकडून आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत एकूण ६९ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ६६
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ* *दिव्यांगांच्या सर्वेक्षणावर विशेष लक्ष द्या; दिव्यांगांसाठी लवकरच सर्वसमावेशक धोरण-मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू*
प्रतिनिधी. पुणे, दि. २२ : दिव्यांग बांधवांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यावे आणि दिव्यांगांचे सर्वेक्षण योग्यरितीने होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू […]
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे
प्रतिनिधी. राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय […]
सोमेश्वरनगर ता.बारामती. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची सासरवाडी चौधरवाडी करंजे येथील ग्रामस्थांनी घेतली सदिच्छा भेट.
प्रतिनिधी. चौधरवाडी गावावर दुष्काळी परिस्थितीचे सावट उत्तरे बाजूस मूर्टी मोढवे या गावांचा भाग पुरंदर उपसा सिंचन योजनेखाली आलेला आहे. तर करंजे मगरवाडी वाकी हा भाग निरा डावा कालव्याच्या नजीक आहे .तरी चौधरवाडी गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर निरा डावा कालवा असल्यामुळे पाण्याच्या तीन स्कीमा करून ही सुद्धा पाणी व्यवस्थित मिळत नाही.त्यात निरा ङावा कालवा अस्तरीकरण चे […]
बारामती ! श्रावणचा पहिला सोमवार सोमेश्वर मंदिर येथे हजारो भाविक नतमस्तक . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून चोख बंदोबस्ताचे नियोजन.
प्रतिनिधी – फिरोज भालदार श्रावण महिना चालू असून सोमेश्वर नगरीमध्ये सोमेश्वरमंदिर येथे लांब लांबून भाविक दर्शनासाठी येत असतात . श्रावण महिना चालू असून सोमेश्वर मंदिर येथे प्रशासनाकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस सहायक निरीक्षक सचिन काळे व करंजे आउटपोस्ट चे पोलिस सहायक उपनिरीक्षक […]
उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान.रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ – राज्यपाल रमेश बैस
प्रतिनिधी. रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि […]
विद्या प्रतिष्ठान येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन*
तहसिल कार्यालयाच्यावतीने विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगल गावडे, डॉ. मंगेश कोळपकर, डॉ. राहुल तोडमल, प्राचार्य डॉ. भरत शिंदे आदी उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय […]
बारामती ! वडगाव निंबाळकर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीआबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे युवक अधक्ष्य […]
पडळकर कुटुंबीयांवर मध्यरात्री हल्ला करणारे टोळके कधी होणार गजाआड ?
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील ठोंबरेवस्ती या ठिकाणी पाच ते सहा व्यक्तीच्या टोळक्याने एका व्यक्तीस मारहाण करीत धारदार शस्त्राने केला वार ही धक्कादायक घटना दि. १६/८/२०२३ रोजी मुढाळे येथील लोखंडवाडी ठोंबरे वस्ती याठिकाणी रात्रीच्या १ वा. सुमारास घडली . सदरील घटनेची हकीकत अशी – संपत पांडुरंग पडळकर रा. ठोंबरेवस्ती याठिकाणी ते १६ तारखेला त्यांनी […]