Home
श्री. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. सोमेश्वर पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100%
श्री. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. सोमेश्वर पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल 100% लागला. त्यात 31 विद्यार्थ्यां पैकि 24 विद्यार्थी डिस्टिंशन् मध्ये 7 विद्यार्थी 1st क्लास मध्ये पास होऊन घवघवीत यश संपादन केले .त्याबद्दल.संस्थेचे अध्यक्ष श्री .पुरुषोत्तम दादा जगताप संस्थेचे सचिव मा.श्री .भारतजी खोमणे सर व संस्थेच्या प्राचार्या सौ. काकडे मॅडम व […]
पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार
प्रतिनिधी सार्वजनिक प्रशासनात नवकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने मानाच्या स्वर्गीय एस. एस. गडकरी पुरस्कारासाठी पुणे जिल्हा परिषदेची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कठोर परिश्रमाचा हा सन्मान आहे, अशी भावना प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. पुणे जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या […]
बारामती शहर पोलीस ठाण्याचे तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त.
प्रतिनिधी दिनांक 31 मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार बारामती शहर पोलीस ठाणे या ठिकाणी नेमणुकीस असलेले भाऊसाहेब पलंगे अरुण रासकर अशोक वनवे हे अनुभवी तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 33 वर्ष सेवा करून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले आहेत. सचोटी शिस्तप्रियता कार्यतत्परता आज्ञाधारकपणा खेळाडू वृत्ती या गुणांमुळे त्यांनी संवेदनशील पुणे ग्रामीण जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये निष्कलंक 33 […]
पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी वारीसाठी टोल माफ, रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्या आषाढी वारीच्या पुर्वतयारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल […]
निंबुत ग्रामपंचायतने डीजे बंदीचा ठराव केला तसाच गुटखा बंदीचा देखील ठराव करावा ग्रामस्थांची मागणी.
संपादक मधुकर बनसोडे. नींबूत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी ज्याप्रमाणे नींबूत गावामध्ये डीजे बंदीचा निर्णय घेतला या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांकडून स्वागतच करण्यात आले मात्र अजून एक निर्णय घेणे गरजेचे आहे तो म्हणजे नींबूत गावामध्ये गुटखा बंदी केली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आता होऊ लागली आहे. डीजे मुळे बीपी, वयोवृद्ध नागरीक, लहान मुलं यांना मोठ्या प्रमाणात […]
आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता – सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये – गिरीश महाजन
प्रतिनिधी आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता – सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, […]
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न
प्रतिनिधी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे यंत्रणांना निर्देश पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात काल (गुरुवारी) आयोजित बैठकीत हे निर्देश […]
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण
प्रतिनिधी बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून आज […]
होळ ८ फाटा येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून चौघाणकडून एका व्यक्तीस जबर मारहाण
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती ! होळ ८ फाटा येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून चौघाणकडून एका व्यक्तीस जबर मारहाण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. दि. २७/०५/२०२३ रोजी रात्री १०.०० वा. सुमारास होळ ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीत आठ फाटा कांबळे वस्ती येथे यशवंत कांबळे यांच्या घराच्या जवळ आले व फिर्यादी देविदास […]
खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील अतिक्रमणाबाबत संयुक्तपणे कारवाई करा-जिल्हाधिकारी
प्रतिनिधी औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खडकी कटक मंडळाने संयुक्तपणे कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे […]