• Home
  • क्राईम
  • मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे बोपदेव घाटातून अपहरण, विनयभंग केल्याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा
Image

मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे बोपदेव घाटातून अपहरण, विनयभंग केल्याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे, असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राची मोबाइलवरुन छायाचित्रे काढली. तरुणीला धमकावून त्याने तिला मोटारीत बसण्यास सांगितले. त्यानंतर मोटार कोंढव्यातील खडी मशीन चौकात नेली. तेथील एका गल्लीत मोटार थांबवून तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पठाण पसार झाला.

घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून पठाणला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शबाना शेख तपास करत आहेत.

कोरेगाव पार्क भागातील एका शाळेच्या प्रशासकाने कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रशांत पुष्टी (वय ५२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन केले. माझे ऐकले नाही तर शाळेतून काढून टाकेन, अशी धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

Releated Posts

लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह…

ByBymnewsmarathi Jul 27, 2026

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026