Home

1 min read

ओबीसींनी आपला संघर्ष अधिक तीव्र करावा== प्रा प्रकाश बगमारे 

प्रतिनिधी ब्रह्मपुरी – मनोज जरांगे यांच्या ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे ओबीसी चे आरक्षण धोक्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व अन्य ओबीसी संघटना व ओबीसी समाजाचे नेते यांच्या माध्यमातून दिनांक 30 ऑगस्ट 2025 पासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि समस्त ओबीसी संघटना यांच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. […]

1 min read

मराठा आंदोलनाला मोठं यश; ६ मागण्या मान्य, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं

प्रतिनिधी  मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आंदोलनस्थळी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून, मराठा समाजाला मोठं यश मिळालं आहे. मान्य झालेल्या मागण्या राज्य सरकारने जाहीर केलेल्या […]

1 min read

सातारा–लोणंद–शिरवळ रस्ता रुंदीकरणावेळी वृक्षांचे पुनर्वसन करावे – संभाजी ब्रिगेडची मागणी.

प्रतिनिधी – सातारा–लोणंद–शिरवळ या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होत असून या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडांची तोड न करता त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. रस्त्यालगत असलेली व अडथळा निर्माण करणारी झाडे अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने मुळासकट उपटून सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यात यावे. त्यामुळे वृक्षांना जीवनदान मिळेल तसेच पर्यावरणाचा समतोल […]

1 min read

बारामती ! होळ,सदोबाचीवाडी,सस्तेवाडी, करंजेपुल गावात उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र ; एआय प्रणालीद्वारे समजणार हवामानाचा अंदाज.

प्रतिनिधी – फिरोज भालदार शेतकऱ्यांना हवामान बदलाची अचूक माहिती मिळण्यासाठी महसूलस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. कृषी खात्याकडून गावोगावी जागेची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने जागेची पाहणी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत केंद्र उभे राहणार आहे. दुष्काळ, चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत स्वयंचलित हवामान केंद्र फायदेशीर ठरणार आहे. आपत्तीचा अंदाज […]

1 min read

२४ तासांत प्रेमभंगातून प्रेयसीवर गोळीबार करणारा आरोपी जेरबंद

प्रतिनिधी बाणेर येथे प्रेयसीवर गोळीबार करून पसार झालेला आरोपी गौरव नायडू (२५, रा. पुनावळे) याला गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने केवळ २४ तासांत अटक केली. दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विरभद्रनगर, बाणेर येथील अश्वमितः हाऊसजवळ फिर्यादी महिलेजवळ अज्ञात इसमाने येऊन गोळीबार केला. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. […]

1 min read

राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त मु. सा. काकडे महाविद्यालयात विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन 

प्रतिनिधी सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन २८ व २९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते. क्रीडास्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व मेजर ध्यानचंद ट्रॉफीचे अनावरण करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या […]

1 min read

राष्ट्रीय लोकअदालतीचे १३ सप्टेंबर रोजी आयोजन.

प्रतिनिधी – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपआपसातील वाद समझोत्याने मिळविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवार १३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन […]

1 min read

पगाराच्या वादातून हॉटेल मालकाचा खून

प्रतिनिधी पुणे शहरात पगाराच्या वादातून झालेल्या भांडणाने थरारक वळण घेतले आहे. कोण्धवे धवडे परिसरातील पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट मध्ये मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत हॉटेल मालक संतोष सुंदर शेट्टी (वय 45) यांचा त्यांच्या हॉटेलमधील वेटर उमेश दिलीप गिरी (वय 38) याच्यासोबत पगारावरून वाद झाला. मालक वारंवार काम व्यवस्थित करण्यास सांगत असल्याने […]

1 min read

सहकारनगरात खोटे पोलीस बनून लॉज कर्मचाऱ्याची फसवणूक

प्रतिनिधी सहकारनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून एका लॉजमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाची फसवणूक केली. घटनेत आरोपींनी साध्या कपड्यांत येऊन पीडित तरुणाला थांबवलं. त्यानंतर कारमध्ये बसवून खोटा अटकप्रसंग रचला. आरोपींनी तरुणावर दबाव टाकून त्याच्याकडून मोबाईलद्वारे युपीआय (UPI) व्यवहारातून तब्बल सहा हजार रुपये उकळले. या घटनेनंतर तरुणाने धीर गोळा […]

1 min read

कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

बारामती, दि. २७: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तथापि, या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी […]