Home

1 min read

कोयतेची पोस्ट कारवाई फस्ट 

प्रतिनिधी कोयता गॅंग हा शब्द अलीकडच्या काळात खूप ठिकाणी चर्चेला जातो कोयता जवळ बाळगणे ,कोयता फिरवणे, कोयता घेऊन धुडगूस घालणे, आणि कोयतेचा डीपी ठेवणे या घटना आपण वारंवार पाहतो या घटनांमधून नेहमीचा गुन्हा तर आहेच परंतु समाजामध्ये दहशत निर्माण करणे समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेलाच हात घालणे इरादा दिसून येतो त्यातून त्याची गुन्हेगारी […]

1 min read

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

 प्रतिनिधी. मुंबई, दि. 27 : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात विधानसभेत वंदे मातरम्‌ व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास […]

1 min read

देशपातळीवरील कार्यशाळेबाबत समाज कल्याण आयुक्तांकडुन आढावा

प्रतिनिधी  राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे याबरोबरच योजना तळागाळापर्यंतच्या नागरीकांपर्यंत पोहोविण्याबाबत केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित देशपातळीवरील कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या या कार्यशाळेसाठी समाज कल्याण विभागाचे आयुक्त […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन.

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार (बारामती ता. ) वडगाव निंबाळकर येथे शनिवार दिनांक 25/ 2 /2023 रोजी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते . यामध्ये प्रमुख वक्ते प्रा. सचिन झगडे (सत्यशोधक विचारवंत ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्थिक परराष्ट्र, शेती , महिला यांचे विषयी धोरण […]

1 min read

पत्रकारांवरील होणाऱ्या हल्ल्याला नक्की जबाबदार कोण?

संपादक मधुकर बनसोडे पत्रकारांवरील हल्ले हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत अनेक ठिकाणी पत्रकारांवरती जीव घेणे हल्ले होत आहेत अशा परिस्थितीमध्ये संविधानाचा चौथा स्तंभ सुरक्षित आहे का?  यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवून समाज हिताचे काम करणारे पत्रकार बांधव या देशात खरंच आज सुरक्षित आहेत का?. या गोष्टीला खरंतर विखुरलेले पत्रकार देखील कुठेतरी […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथील प्रीतम जाधव चा अपंग गटातून शरीरसौष्ठव स्पर्धेत पुणे श्री मध्ये चौथा क्रमांक.

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. २४/ २ /२०२३ रोजी बिबेवाडी पुणे येथे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन मान्यतेने आयोजीत बॉडी बिल्डर्स स्पर्धेमध्ये २०० ते २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .यामध्ये अपंग ( Handicap) गटातून ७० ते ८० स्पर्धक होते .यामधून वडगाव निंबाळकर मधील प्रीतम राजेंद्र जाधव याणे या बॉडी बिल्डर या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच सहभाग […]

1 min read

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी , सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना केली जारी

प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.              औरंगाबाद” या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश […]

1 min read

काऱ्हाटी व मुढाळे येथील जिओ नेटवर्क ग्राहकांच्या सेवा विस्कळीत ग्राहक नाराज.

प्रतिनिधी मुढाळे – विजय गायकवाड. आजच्या काळात मोबाईल ही मोठी गरजेची गोष्ट बनली आहे. त्यातच काऱ्हाटी गाव जाधव वस्ती इतर ठिकाणी मुढाळे ता. बारामती येथे जिओ नेटवर्क ग्राहकांना सेवांमध्ये अनेक समस्या येत आहेत.घरामध्ये नेटवर्क कमी येणे ,कॉल न लागणे, चालू कॉलचा अचानक आवाज जाणे,कॉल अचानक बंद होणे,इंटरनेट डाउनलोडिंग मध्ये समस्या येणे,नेटवर्क क्षेत्राबाहेर सांगणे अशा अनेक […]

1 min read

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन

प्रतिनिधी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक फेब्रुवारी व मार्च २०२३ चे धान्य घेताना समाविष्ट करुन घ्यावेत. लाभार्थ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यास त्यांनी धान्य घेतल्यानंतर प्राप्त होणारे संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आपले धान्य घेतावेळी […]

1 min read

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -२०२२ करिता प्रवेशिकांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२२ करीता १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि, प्रवेशिका पाठविण्यास ८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत […]