मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

देशपातळीवरील कार्यशाळेबाबत समाज कल्याण आयुक्तांकडुन आढावा

mnewsmarathi 26 Feb 2023 1 मिनिट वाचन 9,952 वाचन

प्रतिनिधी

 राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे याबरोबरच योजना तळागाळापर्यंतच्या नागरीकांपर्यंत पोहोविण्याबाबत केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित देशपातळीवरील कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे.

२८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या या कार्यशाळेसाठी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.नारनवरे यांनी कार्यशाळेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत केल्या आहेत. या सर्व समिती प्रमुखांकडुन त्यांनी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

कार्यशाळेच्या प्रथम दिवशी २८ फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री अनुसुचित जाती अभ्युदय योजना (पीएम-एजेएवाय), जेष्ठ नागरिक व पालक कल्याण कायदा व अटल वयो अभ्युदय योजना, तृतीयपंथी यांच्या कल्याणाच्या योजना, हाताने मैला साफ करणारे कामगार, भारत सरकार शिष्यवृती योजना (प्री मॅट्रीक व पोस्ट मॅट्रिक), व्यसनमुक्ती व नशामुक्ती भारत अभियान या विषयाना प्राधान्य देण्यात आले आहे. या विषयावरील चर्चेत उपस्थित मान्यवर सहभागी होणार असून त्या-त्या राज्याचे प्रतिनिधी सादरीकरण करणार आहेत.

पुण्यातील हॉटेल दी रिट्झ कार्लटन येरवडा येथे होणाऱ्या या विभागीय कार्यशाळेकरिता पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दिव दमण, दादरा-नगर हवेली व गोवा असे १२ राज्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक सहभागी होणार आहेत. त्यातील काही मान्यवर पुण्यात दाखल झाले

लेखक

mnewsmarathi

M News Marathi