Home
वडकी गावात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या
प्रतिनिधी दिवे घाट पायथ्याशी असलेल्या वडकी गावच्या परिसरात स्फोट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ६७ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. बाँम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळावरुन जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर -सासवड रस्त्यावरील वडकी गावातील गावदरा वस्तीत ६७ जिलेटिनच्या कांड्या (डिटोनेटर) सापडल्या. गावदरा वस्तीजवळ डोंगर असून, तेथे कांड्या सापडल्याची […]
करंजे येथील सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप.
प्रतिनिधी सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमेश्वर विध्यालय सोमेश्वरनगर भाग शाळा करंजे येथील होतकरू विध्यार्थी यांना (स्कूल-बॅग, कंपास, पेन,वह्या,टिपीन बॅग,पाणी बाॅटल) सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे,उधोजक संतोषराव कोंढाळकर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी […]
हडपसर पोलीस ठाण्याच्या लाॅकअपमधून चोरटा पसार
प्रतिनिधी हडपसर पोलीस ठाण्यातील कोठडीतून (लाॅकअप) चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. गोविंद उर्फ पिंट्या घोडके असे पसार झालेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात घोडकेला अटक करण्यात आली होती. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घोडकेला पोलीस ठाण्यातील कोठडीतून बाहेर काढण्यात […]
शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू
प्रतिनिधी शिरुर परिसरातील दहिवडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने दहिवडी परिसरात शोककळा पसरली. यश सुरेश गायकवाड (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. यश पाचवीत होता. गायकवाड कुटुंबीय दहिवडी गावातील देवमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी सकाळी तो नैसर्गिक विधीसाठी घराच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या फडात गेला. बराच वेळ […]
करंजे येथील सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप.
सोमेश्वर प्रतिनिधी. सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमेश्वर विध्यालय सोमेश्वरनगर भाग शाळा करंजे येथील होतकरू विध्यार्थी यांना (स्कूल-बॅग, कंपास, पेन,वह्या,टिपीन बॅग,पाणी बाॅटल) सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे,उधोजक संतोषराव कोंढाळकर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुखदेवराव शिंदे यांनी करीत […]
पार्टीचा बेत; चिकन, मासोळी शिजवण्यावरून वाद अन् डोक्यात घातला दगड…
प्रतिनिधी उपराजधानीतील सोनेगाव पोलिस ठाणे हद्दीत बांधकाम मजूरी करणाऱ्या चौघांनी सुट्टीच्या दिवशी पार्टीचा बेत रचला. खान्यासाठी चिकन व मासोळी आणली. हे पदार्थ शिजवण्याची तयारी सुरू असतांनाच तिघांचा चवथ्या मजूरासोबत वाद झाला. राग अनावर झाल्याने तिघांनी दगडाने ठेचून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी पसार आहे. लम्बु उर्फ शिवम (३०) […]
शारीरिक संबंधावरून होता वाद, पतीने केले पत्नीचे अपहरण, पिंपरीतील घटना
प्रतिनिधी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सीसीटीव्ही व्हायरल होत असून महिलेला बळजबरीने घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. महिलेचं अपहरण केलं जात आहे. हे त्या सीसीटीव्हीवरून पाहिलं जाऊ शकतं. हे सर्व प्रकरण कौटुंबिक असून पती आणि पत्नीमधील आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंधावरून वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. अपहरण केल्यानंतर गाडीतच पीडितेला डांबून ठेवण्यात आलं. तिला भुलीचे दोन- तीन […]
*आत्माअंतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी प्रात्यक्षिक आधारीत शेतकरी प्रशिक्षण संपन्न*
बारामती, दि. २१: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने कृषी संजीवनी पंधरवडा मोहिमेअंतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी व्यस्थापन प्रात्यक्षिक आधारित शेतकरी प्रशिक्षण मौजे-पणदरे येथे योगेश कोकरे यांचे प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आले. यावेळी ऊस संशोधन केंद्राचे पाडेगाव माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ हनुमंत भोईटे, होळ आघारकर संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भानुदास ईधोळ, कनिष्ठ शास्त्रज्ञ दत्तात्रय साळुंखे, वडगाव निंबाळकरचे मंडळ कृषी अधिकारी […]
काकडे महाविद्यालयाची 52 वर्षात वैभवशाली प्रगती- प्राचार्य डॉ. जाधवर*
सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयाचा 52 वा वर्धापन दिन 20 जून रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभासदस्य प्रसेनजीत फडणवीस, महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख, विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैया काकडे- देशमुख सचिव सतीश लकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन समितीचे […]
जीव धोक्यात घालून रिल्सचे चित्रीकरण, पोलिसांकडून तरुण-तरुणीविरूद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी रिल बनवण्याच्या नादात अनेकजण जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाजवळ घडला. येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका बंद इमारतीच्या छतावरून तरुण-तरुणीने धोकादायकरित्या रिल बनवले. हे रिल वेगाने प्रसारित होताच भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका बंद पडलेल्या इमारतीच्या छतावर तरुण झोपला असून […]