• Home
  • माझा जिल्हा
  • *आत्माअंतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी प्रात्यक्षिक आधारीत शेतकरी प्रशिक्षण संपन्न*
Image

*आत्माअंतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी प्रात्यक्षिक आधारीत शेतकरी प्रशिक्षण संपन्न*

बारामती, दि. २१: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्यावतीने कृषी संजीवनी पंधरवडा मोहिमेअंतर्गत ऊस सुपरकेन नर्सरी व्यस्थापन प्रात्यक्षिक आधारित शेतकरी प्रशिक्षण मौजे-पणदरे येथे योगेश कोकरे यांचे प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आले.

यावेळी ऊस संशोधन केंद्राचे पाडेगाव माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ हनुमंत भोईटे, होळ आघारकर संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भानुदास ईधोळ, कनिष्ठ शास्त्रज्ञ दत्तात्रय साळुंखे, वडगाव निंबाळकरचे मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, पणदरेच्या कृषी सहायिका मनीषा यादव आदी उपस्थित होते.

श्री. भोईटे यांनी ऊस सुपरकेन नर्सरी व ऊस बेणे प्रक्रिया, नर्सरी तयार करणे. रोप लागवडीची योग्य पद्धतीऊस पिकातील हुमणी किड नियंत्रण, रोग नियंत्रणविषयी विषयी मार्गदर्शन केले.

श्री. ईधोळ आणि श्री. साळुंखे यांनी ऊस पिकात आंतरपीक म्हणून सोयाबीन लागवड लागवड करणे, सोयाबीन पीक उत्पादन तसेच सोयाबीनच्या विविध वानांविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी वडगाव निंबाळकर मंडळातील शेतकरी उपस्थित होते.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026