Home

1 min read

रोपे वाटून नवागतांचे स्वागत

प्रतिनिधी विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील इयत्ता ५वी मधील नवागत विद्यार्थ्यांना रोप देवून तसेच पुस्तके वाटून स्वागत करण्यात आले. शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.सचिन चव्हाण सर यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती कडीपत्ता याचे वाटप शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.यादव सर आणि पर्यवेक्षक श्री कोरे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि रोप देऊन स्वागत केले.शाळेतील पहिला दिवस आणि या […]

1 min read

खासगी बँकेतील अधिकाऱ्याला सायबर फसवणुकीप्रकरणी अटक

प्रतिनिधी खासगी बँकेच्या जोधपुर शाखेतील उप व्यवस्थापकाच्या मदतीने आरोपींनी बँक खात्यातून ४१ लाख ८३ हजार रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या पोलिसांनी खासगी बँकेच्या जोधपूर शाखेतील उप व्यवस्थापक पवनशिव भगवान दादीच (३१) याला अटक केली आहे. मुख्य आरोपींना या बँक अधिकाऱ्याने मदत केल्याचा आरोप असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत […]

1 min read

सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तीन महिला ताब्यात

प्रतिनिधी सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा […]

1 min read

बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे नवीन विद्यार्थ्यांचे वह्या व गुलाबपुष्प देऊन स्वागत .

प्रतिनिधी – १५ जून २०२४ रोजी शाळेमध्ये इयत्ता पहिली मधील प्रवेश पात्र विद्यार्थी नवागतांचे स्वागत कार्यक्रम ,मोफत पुस्तक वाटप मोफत, मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप हा कार्यक्रम व शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन चे आयोजन करण्यात आले होते . इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये २१ विद्यार्थी प्रवेश झाले असून इयत्ता पहिली ते चौथी च्या वर्गामध्ये […]

1 min read

*श्री.बाबालाल साहेबराव काकडे( देशमुख) विद्यालय निंबुत येथे नवीन विद्यार्थी स्वागत समारंभ व पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न*

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री. बाबालाल साहेबराव काकडे( देशमुख) विद्यालयात १५ जून रोजी नवीन विद्यार्थी स्वागत समारंभ व इयत्ता पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या वतीने नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना जिलेबी चे गोड जेवण देण्यात आले. […]

1 min read

बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यातच मारहाण

प्रतिनिधी बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर, हवालदार नीलम कर्पे, माया गाडेकर, योगिता आफळे, दोन महिला पोलीस शिपाई, तसेच अक्षय जीवन […]

1 min read

जनाई शिरसाई योजना बंदीस्त पाईपलाईनद्वारे राबविण्यासाठी ४५० कोटी रुपये देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी  सध्या सुरू असलेली जनाई- शिरसाई योजना सुधारित करुन बंदीस्त पाईपलाईनने केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीबचत होऊन अधिक क्षेत्राला लाभ होणार आहे. या योजनांसाठी पाटबंधारे विभागाने सुमारे ४५० कोटी रुपये रुपयांची मागणी शासनाकडे सादर करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. विधानभवन येथे जनाई शिरसाई, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. […]

1 min read

जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी  जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड कार्यालयाने स्पष्ट केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार […]

1 min read

बारामती ! बकरी ईद निमित्त वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित बैठक संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून बकरी ईद निमित्त शांततामय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील मुस्लिम बांधव उपस्थित होते. बैठकीमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी सर्व मुस्लिम समाजाला बकरी ईद निमित्त प्रशासनाने नवीन नियम व अटी कश्याप्रकारे काडले […]

1 min read

अवैद्य पद्धतीने गर्भ निदान व भ्रूण हत्या करणाऱ्या नराधम डॉक्टर विरोधात उपोषण

प्रतिनिधी माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 7 जून 2024 रोजी अवैद्य पद्धतीने गर्भनिदान चाचणी करून भ्रूण हत्या केल्याप्रकरणी डॉक्टर मधुकर शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला परंतु हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने चुकीची फिर्याद लिहून दाखल झाला आणि यामुळे अशा नराधम डॉक्टरला जामीन सुद्धा प्राप्त झाला. अशा नराधम डॉक्टरला जामीन झाला म्हणजे येणाऱ्या भविष्यात हा असाच […]