Home
ओदिशातून पाठविण्यात आलेला दोन कोटींचा गांजा जप्त, सीमा शुल्क विभागाची सोलापूर जिल्ह्यात कारवाई
प्रतिनिधी ओदिशातून महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात आलेला दोन कोटी २० लाख रुपयांचा गांजा केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. सोलापूर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सुधीर चव्हाण (वय ३२, रा. नरसिंगपूर, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. ओदिशातून मोठ्या प्रमाणात गांजा महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क […]
बारामती ! भैरवनाथ यात्रा उत्सव कोऱ्हाळे बुद्रुक आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी भैरवनाथ यात्रा उत्सव कोऱ्हाळे बुद्रुक यांनी यात्रेनिमित्त दि. 2 जून रोजी कोऱ्हाळे बुद्रुक गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बारामती तालुक्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्याकरिता या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात प्रथम येणाऱ्या रक्तदात्याच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी […]
तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याची मालिश; कल्याणीनगरमधील घटनेची चित्रफित व्हायरल
प्रतिनिधी कल्याणीनगर परिसर अपघाताच्या घटनेमुळे चर्चेत आले असताना शनिवारी (१ जून) रात्री नाकाबंदीत ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून, वाहतूक विभागातील त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कल्याणीनगर भागात शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी […]
बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक
प्रतिनिधी शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना वाढत आहेत. कल्याणीनगर अपघाताची घटना मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या बेपर्वाईमुळे घडली होती. हवेली तालुक्यातील अष्टापूर फाटा परिसरात भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांसह सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर अष्टापूर परिसरात शोककळा पसरली. प्रवीण सुनील पाटोळे (वय २८) आणि राजवीर प्रवीण पाटोळे (वय […]
मुलगा सोफ्यावर मृतावस्थेत तर वडील स्नानगृहात विवस्त्र……नागपुरातील गुलमोहरनगरात अजब….
प्रतिनिधी नागपूर महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या मुलाचा घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शिवदास भेंडे (७०), हरीश भेंडे (३९, रा. गुलमोहरनगर) अशी मृत बापलेकांची नावे आहेत. शिवदास यांचा मृतदेह विवस्त्र आढळल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवदास भेंडे हे महापालिका कार्यालयात निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना चार […]
पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप; पिकअप चालवताना दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू
प्रतिनिधी कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरूर तालुक्यातही एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता, की पिकअपने मोटारसायकलसह चालकास ३० फूट फरफटत […]
बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये चोरी झालेल्या घटनेला एक दिवस पूर्ण झाला नाही की दुसरी चोरीची घटना.
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे प्रथमेश पेट्रोल पंपावर भरदिवसा चोरी झाल्याची घटना १ जून २०२४ रोजी १ वाजताच्या दरम्यान घडली . एक व्यक्ती मॅनेजरकडे सुट्टे पैसे च्या कारणानी आला आणि हात चालाकी करत त्यांच्याकडून बावीस हजार रोकड लंपास केली . यामध्ये या चोरट्यांनी होर्नेट गाडीचा उपयोग केला आहे . वडगाव निंबाळकर […]
लष्करात भरतीच्या बदल्यात पैशांची मागणी; लेफ्टनंट कर्नलवर सीबीआयकडून गुन्हा
प्रतिनिधी भरती प्रकरणात लाच मागितल्या प्रकरणी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन लेफ्टनंट कर्नलविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा आणि सुशांता नाहक यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कट रचणे फसवणूक करणे तसेच भ्रष्टाचार विरोधी कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर […]
बारामती ! ड्रोन फिरतात म्हणून वडगाव निंबाळकर पोलिसांचे नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन मात्र त्या रात्रीच वडगाव निंबाळकर परिसरमध्ये पाच ठिकाणी घरफोडी .
प्रतिनिधी – फिरोज भालदार एक दिवसापूर्वीच कोऱ्हाळे बुद्रुक येथे ड्रोन फिरत असल्याची सोशल मीडिया वरती बातमी प्रसारित झाली होती. यावेळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. मात्र घाबरून न जाण्याचे आवाहन केल्याच्या रात्रीच वडगाव निंबाळकर मध्ये पाच ठिकाणी घरफोडी झाली . यावेळी नागरिकांमध्ये जास्तच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये […]
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
प्रतिनिधी सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. […]