Home
धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून
प्रतिनिधी वडगाव शेरी भागात मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचा मुलीने बनाव रचला. मुंबईतील नातेवाइकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगल संजय गोखले (वय ४५, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत गोखले यांचे […]
पिंपरीत नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला गुंडा विरोधी पथकाचा चोप; ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी चिंचवडच्या आकुर्डी भागात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे. रात्री च्या सुमारास रस्त्याने येऊन- जाऊन करणाऱ्या नागरिकांना बेंद्या सोनी नावाचा गुंड त्रास देत होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळताच त्याला चांगलाच चोप देऊन बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर माहिती अशी की, आकुर्डी भागातील उर्दू शाळेसमोर सराईत गुंड बेंद्या हा शर्ट […]
आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
प्रतिनिधी आयपीएलच्या गुजरात टायटन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्यावर बेटिंग उपयोजनद्वारे जुगार लावून नागरिकांकडून पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दहा आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली. सूर्यप्रताप कौशल्य सिंग, (वय १८), शुभम पुलसी धरू (वय २२), राजेश छोटेलाल कुराबहू (वय २५), तिलेश अमितकुमार कुरेह (वय २५), जितू नवीन हरपाल […]
शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
प्रतिनिधी घराच्या दरवाज्यावर लाथ मारल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. मंगळवार पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकास अटक केली. नवाज नासिर खान (वय २७, रा. यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रफिया खान, नासिर खान, सलमान उर्फ टिपू […]
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
प्रतिनिधी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर पती वारंवार चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. कुणाशीतरी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून पत्नीला मारहाण केल्यानंतर तिला विष पाजून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना काटोलमध्ये घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे. आरोपी जितेंद्र सिद्धार्थ तायडे (३१, नरखेड) हा ऑटोचालक असून त्याचे […]
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
प्रतिनिधी मेडिकलशी संलग्नित परिचर्या महाविद्यालयातील ऋतुजा बागडे (१९, रा. भंडारा) या बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे पुढे आल्यावर वसतिगृहातील इतर विद्यार्थी घाबरले. सुमारे ९० टक्के विद्यार्थिनी वसतिगृहातून स्वत:चे घर गाठल्याने शेवटी महाविद्यालयाकडून उन्हाळी सुट्टी जाहीर केली गेली. ऋतुजा ही मेडिकलमधील बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रथम वर्षाला होती. बुधवारी सकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पुढे आल्यावर वसतिगृहातील […]
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरात एका महिलेने न्यायालयात एका विनयभंगाच्या आरोपीविरोधात साक्ष देऊ नये म्हणून तिला घाबरवण्यासाठी आरोपीने महिलेचा चक्क वेगवेगळ्या पद्धतीने विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती आहे. शरफराज तनवीर शेख सत्तार (४०) रा. लकडगंज असे आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मी (बदललेले नाव) असे ३७ वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. लक्ष्मीचा आरोपी […]
रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत पोलीस हवालदाराने आरोपीच्या पत्नीवर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय आतकुलवार यास अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. हवालदार आतकुलवार विविध अवैद्य व्यावसायिकांकडून हप्तावसुली करीत असल्याचीही पोलीस वर्तुळात चर्चा आहे. पतीला एका प्रकरणातून […]
आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा
प्रतिनिधी आयटी हब असलेल्या हिंजवडीत एका फ्लॅटमध्ये चालत असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीत फ्लॅटमध्ये […]
नगर रस्त्यावरील बिवरी गावात दरोडा; महिलांना मारहाण करून १६ लाखांची लूट
प्रतिनिधी नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात असलेल्या बिवरी गावातील एका घरावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी महिलांना शस्त्राचा धाक दाखवून १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली. याबाबत प्रशांत विलास गोते (वय ४०, रा. बिवरी, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत […]