Home
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध*
प्रतिनिधी. : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 […]
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
प्रतिनिधी रेल्वेत १५ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. आरोपीला प्रवाशांनी पकडून मारहाण केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला रुग्णालयातून सोडल्यावर याप्रकरणी अटक करण्यात येणार आहे. तक्रारदार मुलगी दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत होती. शनिवारी तिला रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आल्यानंतर ती वडिलांसह आपल्या घरी जात होती. त्यावेळी शेजारी बसलेल्या आरोपीने तिला […]
नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
प्रतिनिधी एका तरुणाने वस्तीतच राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून मुलीचे लैंगिक शोषण सुरु होते. कुटुंबीयांना याबाबत कळल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तरुणाला अटक केली. ही घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. कृष्णा झनकलाल मच्छिरके (२६) रा. कोराडी, असे […]
महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर कोयता उगारण्यात आल्याची घटना शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात घडली. तेथून निघालेल्या एका महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरुन आरोपी पसार झाला. याप्रकरणी रात्री उशीरा एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. सुभाषनगर परिसरातून दुपारी तरुणी आणि तिची मैत्रीण निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणीवर कोयता उगारला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तरुण दुचाकीवरुन पसार झाला. […]
आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक
प्रतिनिधी सांताक्रुझ येथील शाळेत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिपायाला अटक केली आहे. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. त्याबाबत कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या कुटुबियांना मारण्याची धमकी त्याने दिली होती. […]
संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी संपत्तीच्या वादातून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुंदा आदिनाथ ढुस (वय ५६, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुंदा यांचा भाऊ संजय ठाणगे (वय ५०, रा. वैष्णवी सदन, साईनाथनगर, वडगाव शेरी), त्यांची पत्नी अनिता […]
कोथरूडमध्ये पोपट विकणारे तिघे अटकेत, दोन पोपट वन विभागाकडून जप्त
प्रतिनिधी पहाडी पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना वन विभागाने कोथरुड भागात पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले आहेत. पियूष दत्तात्रय पासलकर (वय २१, रा. कर्वेनगर),यश रमेश कानगुडे (वय २१), सौरभ कोडिंबा झोरे (वय १९, दोघे रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पौड रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात पासलकर, कानगुडे, झोरे पहाडी पोपट […]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे अबॅकस वर्गातील मुलांच्या माता पालकांचा मेळावा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे फेब्रुवारी २०२४ पासून माता पालक गटाच्या मागणीतून मुलांचे अबॅकस वर्ग सुरू असून शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे, सौ मनिषा चव्हाण शाळेतील सर्व शिक्षकांच्या नियोजनातून को-हाळे येथील अबॅकस संचालिका सौ शितल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली १० फेब्रुवारी पासून सदरचे वर्ग सुरु […]
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील कु.स्नेहा वेदपाठक हिने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष स्पर्धेत संकल्पना नृत्य प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले*
प्रतिनिधी. सन २०२३-२४ वर्षातील उत्कर्ष- राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे दि १७ ते २० मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघामधून १८ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा […]
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या भावाकडे १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा-१ मधील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास टोकळे असे या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे गृहरक्षक दलात कार्यरत असून भाईंदर येथे […]